आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 5 सवयींमुळे वाढतो डायबिटीजचा धोका, हॉस्पिटलमध्‍ये भरती होण्‍याची येऊ शकते वेळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्‍थ डेस्‍क- आपल्‍या अनेक चुकींच्‍या सवयींमुळे आपली ब्‍लड शुगर लेव्‍हल वाढते. पुढे याच सवयींमुळे आपल्‍याला डायबिटीज होण्‍याचीही शक्‍यता असते. याच कारणामुळे आज बहुतांश लोकांना डायबिटीजचा आजार आहे. हा अतिशय धोकादायक आजार आहे. यामुळे रुग्‍णालयात भरती होण्‍याचीही तुमच्‍यावर वेळ येऊ शकते.

 

मुलांमध्‍येही वाढत आहे डा‍यबिटीजचा धोका
आज लहान मुलेही दिवसात 3 तासांहून अधिक वेळ टीव्‍ही आणि स्‍मार्टफोनसमोर घालवतात. यामुळे डायबिटीज होण्‍याची शक्‍यता खूप वाढते. याचे कारण म्‍हणजे एकाच जागी खूप वेळ बसून राहिल्‍याने लठ्ठपणा वाढतो. यामुळे शरीरात मुबलक प्रमाणात इन्‍सुलिन तयार होत नाही. या कारणाने शरीरात ग्‍लुकोजचे प्रमाण वाढते आणि सोबतच डायबिटीजचा धोकाही वाढतो. वेगवेगळ्या संशोधनातून हे समोर आले आहे की, 3 तासांहून अधिक टीव्‍ही पाहणा-या 5 मुलांपैकी एका मुलाला डायबिटीज होण्‍याची शक्‍यता असते.


कसे वाचाल डायबिटीजच्‍या धोक्‍यापासून
डायबिटीजचा धोका टाळायचा असेल तर सर्वात महत्‍त्‍वाचे आहे फिजिकली अॅक्‍टीव्‍ह राहणे. रोज 30 मिनिटांच्‍या व्‍यायामानेही ब-यापैकी कॅलरीज बर्न होतात. यामुळे फॅट कमी होते व डायबिटीजचा धोका ब-यापैकी कमी होतो. आपण खाण्‍यामध्‍ये जास्‍तीत जास्‍त फळ, हिरव्‍या पालेभाज्‍या यांचा समावेश केला तर डायबिटीजच्‍या धोक्‍याला कमी करता येते.


पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, त्‍या 5 सवयींविषयी ज्‍यामुळे होऊ शकतो डायबिटीज...

बातम्या आणखी आहेत...