आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Beauty Tips : पुरळ न होण्यासाठी रक्तशर्करा वाढवणाऱ्या आहारापासून लांब राहा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या दमट वातावरणामुळे चेहऱ्यावर पुरळ व पुटकुळ्यांची समस्या भेडसावते. तेलकट त्वचा व केसांमुळे ही समस्या जास्त होते. त्यामुळे रक्तशर्करा वाढवणाऱ्या आहारापासून लांब राहा. कारण यामुळे शरीरातील इंन्सुलीनच्या कार्यवाहीत बदल करतो. त्यामुळे ग्रंथींची समस्या उद्भवतेे. कॉफी, गोड, मादक पदार्थ, कार्बोनेटेड ड्रिंक, कृत्रिम गोड पदार्थ यांचा शक्तशर्करा वाढवणाऱ्या आहारात समावेश आहे. यासाठी आहार सात्विक व सकस असावा. 


- अल्कोहल फ्री मेकअप रिमूवर : चेहऱ्याला नियमित स्वच्छ ठेवा, तसेच झोपण्यापूर्वी मेकअॅप काढा, यासाठी अल्कोहाेल विरहित मेकअप रिमूव्हरचा वापर करा. 


- एक्सफोलिएट : यात त्वचा मऊ व मुलायम असते. तसेच त्वचेच्या टोनमध्ये सुधारणा होऊन ती प्रसन्नदायी दिसते. एक्सफोलिएट केल्यामुळे त्वचेतील मृत कोशिकांपासून सुटकारा मिळतो. त्वचा ताजीतवानी राहते. यात स्क्रब, फेसवॉश, क्रीम किंवा कोणतीही हिरव्या भाजीपाल्यांपासून चेहऱ्याची व शरीराची स्वच्छता करता येईल. जसे टाेमॅटो चेहऱ्यावर लावून त्याचे स्क्रब करा. २० ते २५ मिनिटांनंतर पुन्हा चेहऱ्याला धुऊन काढा. यामुळे चेहऱ्यावरील सारी मृत त्वचा निघून जाईल आणि चेहरा उजळूून निघेल.  


पुढील स्लाईड्सवर वाचा, इतर दोन टिप्स...

बातम्या आणखी आहेत...