Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Best Foods For Arthritis

अर्थरायटिसपासून मुक्ती हवी, मग आहारात करा या पदार्थांचा समावेश

हेल्थ डेस्क | Update - Aug 03, 2018, 12:04 AM IST

अर्थरायटिस हा एक असा आजार आहे ज्याने सूज, वेदनेसह शरीर आखडते. आपल्या हाडांना कमजोर करून शरीर कुरूप करणारा हा आजार असून य

 • Best Foods For Arthritis

  अर्थरायटिस हा एक असा आजार आहे ज्याने सूज, वेदनेसह शरीर आखडते. आपल्या हाडांना कमजोर करून शरीर कुरूप करणारा हा आजार असून यामुळे सांध्यांमध्ये खूप वेदना होतात. जर रुग्णांनी नियमित खाण्या-पिण्यात काही पदार्थ व्यवस्थित घेतले तर या रोगात पडकन आराम मिळतो आणि वेदनाही कमी होतात.


  1. ब्रोकली आणि कोबी
  प्रथिने, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट, लोह, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि क्रोमियमसारखेे पौष्टिक तत्त्वे भरपूर असणारी ब्रोकली खाल्ल्यास रक्तातील साखरेचा स्तर सामान्य राहतो. यातील फायटोकेमिकल्स आजार आणि इन्फेक्सनपासून बचाव करतात. फूल कोबीमध्येही अनेक प्रकारचे अँटी ऑक्सिडेंट्स असतात. जे आपली नैसर्गिक रोगप्रतिकारशक्तीला बळकट करतात.


  2. लसूण
  जेवण स्वादिष्ट करण्याबरोबरच लसूण आपल्याला जिवाणूंपासून वाचवतो. यात प्रतिजैविके, जिवाणू प्रतिबंधक तसेच बुरशीजन्य प्रतिबंधक घटक असतात. शिवाय लसनात अनेक अँटी ऑक्सिडंट्स असतात जे शरीराला कर्करोग, अर्थरायटिस आदी गंभीर रोगांपासून वाचवते. अर्थरायटिस झालेल्यांनी तर रोज जेवणात लसणाच्या पाकळ्या अवश्य खाव्यात.

  3.फळे आणि भाज्या
  अर्थरायटिसच्या रुणांनी वेगवेगळ्या रंगांच्या भाज्या व फळे नियमित खाल्ल्यास त्याचा फायदा होतो. दाट रंगांची फळे आणि भाज्यांमध्ये अनेक पौष्टिक तत्त्वे असतात. शिवाय यात बऱ्यापैकी अँटी-ऑक्सिडंट्सची मात्राही असते. त्यामुळेच दाट रंग असलेली फळे आणि भाज्या नियमित आहारात घेतल्या तर या आजारावर बऱ्यापैकी उपयोग होतो.

 • Best Foods For Arthritis

  4. हळद 
  हळद ही एक नैसर्गिक प्रतिजैविक आहे. यात करक्युमिन नावाचे तत्त्व असते जे विषाणूंना मज्जाव करते. त्यामुळे अर्थरायटिसचा आजार असणाऱ्यांनी हळदीचा वापर अवश्य करायला हवा. हळदीत अनेक औषधी गुण असतात, ज्यांचा उपयोग त्वचा, पोट व शरीराच्या अनेक आजार बरे करण्यासाठी होऊ शकतो. 

 • Best Foods For Arthritis

  5. ओमेगा-३ अॅसिड 
  याचे सेवन हे अर्थरायटिसचे आजारापासून बचावासाठी फायद्याचे असते. आपल्या धमण्या रुंद व्हायला याचा उपयोग होतो. यामुळे धमण्यांतून रक्तप्रवाह बऱ्यापैकी योग्य पद्धतीने होतो. यातील एन्झाइम्स फॅट हे पचनसंस्थेला मजबूत करण्यास फायदेशीर आहे. माशांचे तेल, अल्गी तेल, सॅमन नावाचा मासा यात ओमेगा-३ भरपूर प्रमाणात असते. याशिवाय शाकाहारी लोक जवस, अक्रोड, मोहरीचे तेल व बेरीचा आहारात समावेश करून हे मिळवू शकतात. 

Trending