Home | Jeevan Mantra | Teerath Darshan | Best Places To Visit In May-June

उन्‍हाळ्यात स्‍वर्गापेक्षा कमी नाहीत हे 6 Detinations, 3 ते 6 हजार रुपयांत या फिरून

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - May 23, 2018, 12:40 PM IST

भारतात असे अनेक टुरिंग डेस्‍टीनेशन आहेत जेथे कमी खर्चात तुम्‍ही फिरून येऊ शकता.

 • Best Places To Visit In May-June

  यूटिलिटी डेस्‍क- भारतात असे अनेक टुरिंग डेस्‍टीनेशन आहेत जेथे कमी खर्चात तुम्‍ही फिरून येऊ शकता. उन्‍हाळ्याच्‍या सुट्टयांमध्‍ये कुटुंबासोबत अशा ठिकाणी जाण्‍याचा तुम्‍ही प्‍लॅन करू शकता, जेथे खर्चही फार होणार नाही आणि तुम्‍ही तुमच्‍या सुट्टयाही एन्‍जॉय कराल. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच काही डेस्‍टीनेशंसबद्दल सांगणार आहोत, जेथे तुम्‍ही 2 ते 3 दिवसांसाठी व्‍हॅकेशन प्‍लॅन करू शकता ते 3 ते 6 हजार रुपयांत (प्रति व्‍यक्तिसाठी).

  1) ऋषिकेश- हरिद्वार
  - तुम्‍हाला तीर्थयात्रा आणि अॅडव्‍ह‍ेंचरचे कॉकटेल हवे असेल तर ऋषिकेश- हरिद्वारचा ऑप्‍शन तुमच्‍यासाठी आहे. ही दोन्‍ही ठिकाणे एकमेकांना जोडलेली आहेत.
  - येथे तुम्‍ही 2 ते 3 रात्री थांबू शकता. 3 हजार रूपयांहून कमी खर्चात येथे राहणे, खाणे-पिणे होऊ शकते. हे असे ठिकाण आहे जेथे अत्‍यंत कमी दरात धर्मशाळा आणि आश्रमांची सोय सहज उपलब्‍ध आहेत. केवळ 500 रुपयांत एक खोली तर दिवसभराचा नाष्‍टा आणि जेवण 100 रुपयांहून कमी खर्चात होऊ शकते.


  पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, कमी खर्चात फिरता येईल अशा डेस्‍टीनेशन्‍सविषयी...

 • Best Places To Visit In May-June

  शिमला-कुफरी
  सुट्टंयासाठी शिमला-कुफरी हे एक शानदार ठिकाण आहे. यासाठी 2 दिवस - 2 रात्रींच्‍या पॅकेजचा तुम्‍ही विचार करू शकता. 5000 हजार रूपयांपर्यंत हा टुअर पॅकेज होऊ शकतो. तुम्‍हाला अलिशान हॉटेल नको असेल तर 1500 ते 1800 रुपयांत तुम्‍हाला सहज एक चांगले हॉटेल मिळू शकते. येथे खाणेपिणेही ब-यापैकी स्‍वस्‍त आहे.  

 • Best Places To Visit In May-June

  कसौल 
  मित्रांसोबत फिरायचे असेल तर तुमच्‍यासाठी हिमाचल प्रदेशमधील कसौल हे एक चांगले ठिकाण आहे. चंदीगढ-मनाली दरम्‍यान असलेले ते एक हिल स्‍टेशन आहे. बॅचलर्ससाठी हे एक फेव्‍हरेट डेस्‍टीनेशन आहे. 
  - पीक सीझन नसताना येथे 800 रुपयांपर्यंत हॉटेल मिळते. 100 ते 150 रुपयांत तुमची दिवसभराची पेटपुजा होईल. 3 हजार ते 3500 रुपयांत दोन दिवस- दोन रात्रींचा टुर पॅकेज तुम्‍हाला सहजतेने मिळू शकतो. 

   

 • Best Places To Visit In May-June

  नैनीताल 
  नैनीताल उत्‍तराखंडमधील एक शानदार आणि किफायती बजेटमधील टूरिंग डेस्‍टीनेशन आहे. पावसाळ्याचे काही दिवस वगळले तर येथे कधीही जाऊ शकता. नैनीतालच्‍या आसपासही अनेक सुंदर स्‍थळे आहेत. नैनीताल त्‍यांचे सेंटर आहे. येथे सहजतेने हॉटेल आणि गेस्‍ट हाऊस मिळते. त्‍यांची संख्‍या येथे एवढी आहे की तुम्‍हाला सहजतेने 1000 रुपयांपर्यंत एक स्‍ट्रँडर्ड खोली मिळेल. खाण्‍यापिण्‍यासाठीही नैनीताल चांगले टूरिंग पॉइंट आहे. 

   

 • Best Places To Visit In May-June

  पंचमढी 
  मध्‍यप्रदेशातील पंचमढीदेखील फिरण्‍यासाठी एक चांगले ऑप्‍शन आहे. 3 हजार रुपयांत तुम्‍ही दोन दिवस आणि दोन रात्रींचा टुअर प्‍लॅन करू शकता. पंचमढीमध्‍ये 1000 रुपयांत सहजतेने एक चांगले हॉटेल रूम मिळू शकते. पंचमढीमध्‍ये खाणेपिणेही स्‍वस्‍त आहे. 

   

Trending