आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुस-यांचे डिप्रेशन दुर करण्‍यासाठी ओळखले जायचे भय्यू महाराज, स्‍वत: तणावामुळे केली आत्‍महत्‍या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्‍थ डेस्‍क- 50व्‍या वर्षी अध्‍यात्मिक गुरू भय्यू महाराज यांनी स्‍वत:च्‍या डोक्‍यात गोळी घालून आत्‍महत्‍या केली आहे. कुटुंबातील संपत्‍तीच्‍या वादावरून ते तणावात असल्‍याची चर्चा आहे. भय्यू महाराज यांना आधुनिक आणि राष्‍ट्रीय संत मानले जायचे. 49व्‍या वर्षी त्‍यांनी दुसरा विवाह केला होता. प्रधानमंत्री मोदींपासून ते सरसंघचालक मोहन भागवत यांच्‍याशी त्‍यांचे चांगले संबंध होते. विलासराव देखमुख, शरद पवार, लता मंगेशकर, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आशा भोसले, अनुराधा पौडवाल आणि फिल्म अॅक्टर मिलिंद गुणाजी त्‍यांच्‍या आश्रमात जाऊन आले आहेत.

 

त्‍यांच्‍या पत्‍नीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्‍यांनी एका कपड्याच्‍या ब्रँडसाठी मॉडेलिंगही केले होते. नंतर ते गृहस्‍थ संत बनले. पोलिसांना घटनास्‍थळी एक सुसाइड नोटही आढळून आली आहे. यामध्‍ये भय्यूजी महाराजांनी आपण प्रचंड मानसिक तणावाखाली असल्‍याचे सांगितले आहे. अनुयायांनीही ते काही दिवसांपासून तणावाखाली असल्‍याचे सांगितले आहे.

 

डिप्रेशनपासून असा करा बचाव  
1) नेहमी पॉझिटीव्‍ह अॅटिट्यूड ठेवा.  
2) आयुष्‍यात घडणा-या काही गोष्‍टींवर आपले नियंत्रण नसते, हे सत्‍य स्‍वीकारा.
3) रिलॅक्‍सेशन टेक्निक जसे की, मेडिटेशन, योगा यांचा आपल्‍या डेली रूटीनमध्‍ये समावेश करा.


पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, तणाव दूर करण्‍याचे इतर उपाय...

 

बातम्या आणखी आहेत...