आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या झाडाला कापल्‍यावर निघते रक्‍त, औषधी म्‍हणून लाकडाचा होतो उपयोग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वृक्षदेखील श्‍वास घेतात, ते सजीव असतात हे अनेकांना माहिती असते. मात्र त्‍यांना कापताना कोणीही या गोष्‍टीकडे लक्ष देत नाहीत. मात्र विचार करा झाड कापताच त्‍यातून रक्‍त वाहू लागले तर? 

 

दक्षिण आफ्रीकेमध्‍ये अशी झाडे आहेत. ज्‍यांची लहानशीही फांदी तोडली तरी त्‍यातून रक्‍त वाहू लागते. या झाडांना पाहण्‍यासाठी दूरून याठिकाणी लोक येतात.  विशेष म्‍हणजे हे रक्‍त अगदी मानवाच्‍या रक्‍तासारखे आहे.

 

असे आहे हे झाड 
दक्षिण आफ्रीकेमध्‍ये या झाडाला किआट मुकवा, मुनिंगा आणि ब्‍लडवूड ट्री अशा अनेक नावांनी ओळखले जाते. या झाडाला कुठूनही कापले तरी रक्‍त येते. या झाडांची बनावटही इतर झाडांपेक्षा वेगळी आहे. या झाडांवर दाट पाने आणि यावर पिवळ्या रंगांची फुल येतात. यांची लांबी 12 ते 18 मीटर ऐवढी असते. झाड कापल्‍यावर यातून लाल रंगाचा द्रव स्त्रवतो, जो एकदम रक्‍तासारखा दिसतो. 


पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, झाडाच्‍या रक्‍ताचा कुठकुठे वापर होतो आणि त्‍यापासून कोणती औषधी बनतात...