Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | children healthy diet information in marathi

मुलांना निरोगी ठेवायचे असेल तर आहारासंबंधी या गोष्टी लक्षात ठेवा

हेल्थ डेस्क | Update - Jul 27, 2018, 03:16 PM IST

मुलांमध्ये लठ्ठपणा व मधुमेहाची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. एका संशोधनानुसार 2025 पर्यंत मुलांमध्ये मधुमेह 70 टक्क्यांपर

 • children healthy diet information in marathi

  मुलांमध्ये लठ्ठपणा व मधुमेहाची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. एका संशोधनानुसार 2025 पर्यंत मुलांमध्ये मधुमेह 70 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. असंतुलित आहार हे या समस्यांचे मुख्य कारण आहे. त्यामुळे वाढत्या वयाच्या मुलांना पौष्टिक आहार देणे गरजेचे आहे. जेणेकरून त्यांचा चांगल्या पद्धतीने विकास होईल. जाणून घेऊया मुलांच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा.


  01. केळी आहेत लाभदायी
  मुलांच्या रोजच्या आहारामध्ये फळांचा समावेश असला पाहिजे. वाढत्या मुलांसाठी केळी अत्यंत गुणकारी असल्याचे म्हटले आहे. केळी खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो इत्यादी भ्रम केळींबाबत अनेक लोकांच्या मनात आहेत. तथापि, केळींमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे प्रमाण भरपूर असते. हे घटक वाढत्या वयामध्ये शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत.


  02. अवश्य खा पालक
  हिरव्या भाज्यांमधील फायबर शरीरासाठी खूप गरजेचे असतात, हे आपण सर्वांना माहीत आहेच. या भाज्यांमध्येही पालक शरीरासाठी सर्वात महत्त्वाची आहे. पालकाच्या भाजीत असलेले झिंक आणि फायबर मेंदू तल्लख करतात आणि त्वचा तजेलदार बनवतात. मुलांना पालकाचे सूप, डाळ, चपाती आणि भाजी आदी कोणत्याही रूपात दररोज अवश्य द्या.


  03. जंक फूडला दूर सारा
  तळलेले पदार्थ आणि जंक फूडच्या सेवनाने शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत व्हायला लागते आणि प्रकृती बिघडते. त्यामुळे मुलांना बाहेरचे उघड्यावरील पदार्थ खायला देऊ नका. घरच्या घरीच त्यांना पौष्टिक आहारात चमचमीत खायला देण्याचा प्रयत्न करा. आठवड्यातून एकदा बाहेरचे पदार्थ खायला देता येतील.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन गोष्टी...

 • children healthy diet information in marathi

  04. दूध आहे आरोग्यदायी 
  रात्री झोपण्यापूर्वी मुलांना एक कप कोमट दूध अवश्य प्यायला द्या. शक्य झाल्यास यात चिमूटभर हळदही घाला. यामुळे मुलांच्या शरीराची हाडे आतून बळकट होतील आणि त्यांचे शरीर निरोगी राहील. हळद असलेले दूध मुलगा पीत नसेल तर दुधात मध टाकून द्या. साखर व चॉकलेटचे दूध देऊ नका. ते आरोग्यासाठी कमी फायद्याचे असते. 

 • children healthy diet information in marathi

  05. फॅट्स आवश्यक 
  शरीराच्या विकासासाठी फॅट‌्स खूप गरजेचे आहे. फॅट्समुळे लठ्ठपणा येतो, असे नाही. खरे म्हणजे, चांगले फॅट्स शरीराच्या संपूर्ण विकासात मदत करतात. मुलांच्या रोजच्या आहारात काही प्रमाणात तूप, बटर, काजू, बदाम आदींचा अवश्य समावेश करा. यामुळे त्यांच्या मेंदूला पूर्ण पोषण मिळते. हे पदार्थ दुधासोबत शेक बनवून किंवा भाजून रात्री झोपण्यापूर्वी देणे फायद्याचे ठरेल. 

Trending