आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्‍वस्‍तात स्‍वच्‍छ करा टँकमधील पाणी, काही मिनिटांची आहे ही ट्रीक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाण्‍याच्‍या टँकमध्‍ये बॅक्‍टेरिया आणि व्‍हायरस अतिशय वेगाने वाढतात. यापैकीच एक ई कोलाई व्‍हायरसमुळे तर पोटाचे अनेक गंभीर आजार होण्‍याचे धोके असतात. त्‍यामुळे नियमितपणे टँकची सफाई करणे अतिशय महत्‍त्‍वाचे अाहे. मात्र  मोठमोठ्या टँक्‍सना व त्‍यातील पाण्‍याला स्‍वच्‍छ ठेवणे हे काही सोपे काम नाही.


येथे आम्‍ही एक अशी ट्रीक सांगत आहोत ज्‍याच्‍या मदतीने काही मिनिटांत तुम्‍ही आपले टँक स्‍वच्‍छ करू शकतात. यासाठी तुम्‍हाला केवळ एका वस्‍तूची गरज असेल ते म्‍हणजे ब्‍लीचिंग पावडर. डॉ. गीतांजी शर्मा सांगतात की, ब्‍लीचींग पावडर पाण्‍यातील प्रत्‍येक प्रकारच्‍या व्‍हायरसला नष्‍ट करते. यामुळे पाणी वापरण्‍यासाठी अतिशय सुरक्षित बनते. मात्र ब्‍लीचींग पावडरला सांगितलेल्‍या प्रमाणातच वापरणे महत्‍त्‍वाचे आहे. चला तर जाणून घेऊया कसा करतात याचा यूज.


> मार्केटमध्‍ये ब्‍लीचींग पावडर सहजतेने मिळते. जवळपास 30रुपयांमध्‍ये याचे 100 ते 150 ग्रॅम पॅकेट मिळते.
> 1 लीटर पाण्‍यामध्‍ये 5 मिलीग्रॅम ब्‍लीचींग पावडर टाका.
> टँक 1000 लीटरचे असेल तर तुम्‍हाला 4 ग्रॅम ब्‍लीचींग पावडर लागेल.
> ब्‍लीचींग पावडरमध्‍ये क्‍लोरीन असते. यामुळे पाण्‍यातील बॅक्‍टेरिया तसेच व्‍हायरस नष्‍ट होऊन जातात.
> ब्‍लीचींग पावडरला 15 मिनिट पाण्‍यात ठेवून नंतर हे मिश्रण टँकमध्‍ये टाकून द्या. यामुळे टँकमध्‍ये शेवाळही येणार नाहीत.  

बातम्या आणखी आहेत...