आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Health: वैवाहिक आयुष्यात आनंद टिकवून ठेवण्यासाठी प्या शेवग्याचे सूप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेवग्याच्या शेंगांचा वापर अनेक प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो. सर्दी-खोकला, घश्यातील खवखव आणि छातीत कफ झाल्यावर शेवग्याचा वापर करणे फायदेशीर असते. तुम्ही शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवून किंवा शेंगा उकळून याचा वापर करु शकता. यासोबतच तुम्ही हे पाण्यात चांगल्या प्रकारे उकळून हे पाणी पिऊ शकता. तुम्हाला श्वास घेण्यास अडचण येत असेल तर शेवग्याचा वापर तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. 
शेवग्याचा सूप पिणे खुप जास्त फायदेशीर असते. यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमीन सी असते. व्हिटॅमीन सीसोबतच हे बीटा केरोटीन, प्रोटीन आणि अनेक प्रकारच्या गुणांनी भरपूर असते. यामध्ये मॅगनीज, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. हे सर्व तत्त्व शरीराच्या विकासासाठी खुप आवश्यक आहेत.

 

कसे बनवावे शेवग्याच्या शेंगांचे सूप? 
शेवग्याच्या शेंगांचे लहान-लहान तुकडे करा. दोन कप पाणी घेऊन हे मंद आचेवर उकळण्यासाठी ठेवा. पाणी उकळत असताना यामध्ये कापलेल्या शेवग्याच्या शेंगा टाका. तुम्ही यामध्ये शेवग्याची पानंही टाकू शकता. पाणी अर्धे राहिल तेव्हा शेवग्याच्या शेंगाच्या मधील गर काढून घ्या आणि वरचा भाग वेगळा करा. यामध्ये थोडे मीठ आणि मिरपूड मिसळून प्या.


शेवग्याच्या शेंगांचे फायदे 
1. शेवग्याच्या शेंगांचा सूप नियमित प्यायल्याने सेक्शुअल हेल्थ सुधारते. शेवगा हा महिला आणि पुरुष दोघांसाठीही फायदेशीर असतो.
2. शेवग्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुण असतो. हे अनेक प्रकारच्या इन्फेक्शनपासून सुरक्षित ठेवण्यात मदत करते. यासोबतच यामधील व्हिटॅमीन सी इम्यून सिस्टम बूस्ट करण्याचे काम करते. 
3. शेवग्याच्या शेंगांचे सूप पचनक्रिया मजबूत बनवण्याचे काम करते. यामधील फायबर्स बध्दकोष्ठची समस्या होऊ देत नाही.
4. दम्याची समस्या असल्यावर शेवग्याचे सूप पिणे फायदेशीर असते. सर्दी-खोकला आणि कफपासून सुटका मिळवण्यासाठी याचा वापर घरगुती औषधीच्या रुपात केला जातो.
5. शेवग्याच्या शेंगांचा सूप रक्त शुध्द करण्यात मदत करते. रक्त शुध्द झाल्यामुळे चेहरा उजळतो.
6. डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी शेवगा खाण्याचा सल्ला दिला जातो.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...