Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | food for healthy heart information in marathi

जाणून घ्या, कोणता आहार घेतल्याने हृदय निरोगी राहते आणि वाढते आयुष्य

हेल्थ डेस्क | Update - Jul 28, 2018, 12:02 AM IST

हृदयरोग्यांनी फॅटयुक्त जेवणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. कारण सॅच्युरेटेड फॅटचा थेट संबंध कोरोनरी हार्ट डिसिजशी

  • food for healthy heart information in marathi

    हृदयरोग्यांनी फॅटयुक्त जेवणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. कारण सॅच्युरेटेड फॅटचा थेट संबंध कोरोनरी हार्ट डिसिजशी असतो. या रुग्णांनी फॅटयुक्त जेवणाऐवजी ताजी फळे, हिरव्या भाज्या इत्यादी पौष्टिक खाद्य पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांमधील घटक हृदयरोग्यांसाठी सुरक्षा कवच प्रदान करतात. जाणून घेऊया कोणत्या आहाराच्या सवयी लावल्याने हृदय निरोगी राहील.


    प्लेन ओट्स
    असे म्हटले जाते की, कोलेस्टेरॉल संपवण्यासाठी धान्याची भूमिका महत्त्वाची ठरते. मात्र, हृदयरोग्यांना केवळ धान्याचे सेवन करणे पुरेसे ठरत नाही. ओट्स त्यांच्यासाठी उत्तम पर्याय आहे. यातही फ्लेवर्ड ओट्स साखरेमध्ये तयार केले जातात. त्यामुळे प्लेन ओट्स आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहेत.


    मोहरीचे तेल आणि ऑलिव्ह ऑइल
    मोहरीचे तेल आणि ऑलिव्ह ऑइल दोन्हीही मोनोसॅच्युरेटेड फॅटचा चांगला स्रोत आहेत. यामुळे कोलेस्टेरॉल आणि ब्लड शुगर दोन्हींची पातळी कमी करण्यामध्ये मदत होते. हृदय रुग्णांसाठी या तेलांमध्ये शिजवलेले अन्न खाणे औषधाचे काम करते. ग्रीन किंवा ब्लॅक ऑलिव्ह खाणेही चांगले आहे.


    लोह गरजेचे आहे
    लोहाची कमतरता असलेल्या लोकांनी शेंगा, पालक इत्यादी हिरव्या भाज्या आणि बेदाण्याचे सेवन केले पाहिजे. जर लोहाची पातळी पौष्टिक जेवणानंतरही खालावत असेल तर रुग्ण आयर्न सप्लिमेंटचाही वापर करू शकतो. आदर्श स्थितीमध्ये प्रौढांच्या शरीरामध्ये ४ ग्रॅम लोह असले पाहिजे.


    पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन गोष्टी...

  • food for healthy heart information in marathi

    सुका मेवा फायद्याचा 
    बदाम आणि अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई असते. हे जीवनसत्त्व एलडीएल कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. सोबतच यात भरपूर ओमेगा ३ फॅटी अॅसिड असल्याने हृदयरुग्णांसाठी फायद्याचे आहे. याशिवाय ब्ल्यू बेरीजदेखील कोलेस्टेरॉल पातळी कमी करण्यासाठी खाता येऊ शकते. यामुळे रक्त प्रवाहदेखील चांगला राहतो. 

  • food for healthy heart information in marathi

    डाळिंबाचा रस 
    डाळिंबामध्ये अँटिऑक्सिडंट चांगल्या प्रमाणात असते. यातील पॉलिफेनॉल्स आणि अँथोसाइआनिन्स घटक आर्टरीज कठीण होण्यापासून बचाव करतात. डाळिंबाच्या रसाने हृदयापर्यंतचा रक्तप्रवाह सुधारतो. इतर फळांत सफरचंद चांगला पर्याय आहे. तथापि, केळींमध्येही काही प्रमाणात ओमेगा-३ फॅटी अॅसिड आढळून येते. 

Trending