Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Food To Avoid During Periods

Health: पीरियड्सच्या काळात खाऊ नका हे 8 पदार्थ, कमी होतील समस्या

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 30, 2018, 05:10 PM IST

अनियमित लाइफस्टाइल आणि बॅलेंस डायट न घेतल्याने पीरियड्स प्रॉब्लम वाढू शकते

 • Food To Avoid During Periods

  अनियमित लाइफस्टाइल आणि बॅलेंस डायट न घेतल्याने पीरियड्स प्रॉब्लम वाढू शकते. असे अनेक पदार्थ आहेत जे या काळात अव्हॉइड करावे. बॉम्बे हॉस्पिटलच्या चीफ डायटीशियन, डॉ. प्रियंका चौहान पीरियड्समध्ये हे 8 पदार्थ अव्हॉइड करण्याचा सल्ला देतात. त्या सांगत आहेत अशाच पदार्थांविषयी...


  का होते पीरियड्स प्रॉब्लम : बॉडीमध्ये कमजोरी किंवा जास्त स्ट्रेस असल्यामुळे पीरियड्स प्रॉब्लम होऊ शकते. याव्यतिरिक्त वजन खुप जास्त किंवा कमी असल्याने, जास्त औषधींचा प्रयोग केल्याने आणि बँलेंस डायट न घेतल्याने पीरियड्स प्रॉब्लम वाढते. अनेक वेळा हार्मोन बॅलेंस बिघडल्यामुळे आणि थायरॉइडची समस्या झाल्यामुळे पीरियड्स प्रॉब्लम वाढते.

  1. डेयरी प्रोडक्ट्स
  यामधील सॅच्यूरेटेड फॅट्स पीरियड्सच्या काळात होणा-या वेदना वाढवते.

  2. मीठाचे पदार्थ
  लोणची, सॉस, पोटॅटो चिप्समध्ये खुप मीठ असते. यामुळे बॉडीमध्ये सोडियम लेव्हल वाढून यूरिन प्रॉब्लम निर्माण करते.

  3. ऑयली आणि स्पाइसी फूड
  पीरियड्सच्या काळात जास्त तळलेले आणि स्पायसी फूड खाल्ल्याने गॅस, अपचन, पोट फुगणे सारखी समस्या होऊ शकते.

  4. चहा-कॉफी
  चहा-कॉफीमधील कॅफीनमुळे जास्त यूरिनेशन होऊ शकते. यामुळे मूड खराब होतो आणि झोप न येण्याची समस्या वाढते.

  5. कोल्ड ड्रिंक्स
  कार्बोनेटेड ड्रिंक्समध्ये खुप जास्त कॅफीन आणि शुगर असते. यामुळे पीरियड्स अनियमित होतात.

  6. रिफाइंड ग्रेन
  ब्रेड, पास्ता आणि मैद्याने तयार केलेले पदार्थ पीरियड्सची समस्या वाढवतात. यामुळे बध्दकोष्ठता आणि अॅसिडिटी होते.

  7. नॉनव्हेज
  मीटमध्ये खुप जास्त फॅट असतात. यामुळे पोटाचा त्रास आणि वेदना वाढतात. गॅस किंवा बध्दकोष्ठतेसारख्या पोटाच्या समस्या होऊ शकतात.

  8, जंक फूड
  यामध्ये जास्त ट्रान्स फॅट्स असतात. यामुळे एस्ट्रोजन लेव्हल वाढते ज्यामुळे यूटेरसमध्ये वेदना होतात.

Trending