Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | for muscular body buffalo milk or cow milk

पीळदार शरीरयष्टी बनवण्यासाठी गाईचे दूध चांगले की म्हशीचे?

हेल्थ डेस्क | Update - Jul 23, 2018, 02:26 PM IST

भारतामध्ये गाय आणि म्हैस दोन्हींच्या दुधाचा वापर केला जातो. अनेक वेळा असा प्रश्न उपस्थित होतो की, गाय आणि म्हैस या दोन्ह

 • for muscular body buffalo milk or cow milk

  भारतामध्ये गाय आणि म्हैस दोन्हींच्या दुधाचा वापर केला जातो. अनेक वेळा असा प्रश्न उपस्थित होतो की, गाय आणि म्हैस या दोन्हींमधील कुणाचे दूध फायदेशीर आहे? फोर्टिस हेल्थकेअर हॉस्पिटलच्या चीफ डायटीशियन गुलजीत कौर सांगतात की, गाय आणि म्हैस दोन्हींचे दूध आपापल्या गरजेनुसार फायदेशीर आहे. परंतु मसल्ससाठी म्हशीचे दूध जास्त फायदेशीर असते. याबाबत ही माहिती...


  म्हशीचे दूध फायदेशीर का?
  गुलजीत कौर सांगतात की, म्हशीच्या दुधामध्ये गायीच्या दुधापेक्षा जास्त न्यूट्रिएंट्स असतात. हे जास्त घट्ट असते. लहान बाळांसाठी किंवा ज्या रुग्णांना दूध सहज पचन होत नाही. त्यांच्यासाठी गायीचे दूध चांगले असते. ज्यांना बॉडी बनवायची आहे त्यांच्यासाठी म्हशीचे दूध चांगले असते. (अदर सोर्स : सोर्स नॅशनल सेंटर फॉर बायो टेक्नॉलॉजिकल इन्फॉर्मेओशन यूएसए)


  काय आहे फायदेशीर?
  1. मसल्स बिल्डिंगसाठी आवश्यक न्यूट्रिएंट्स प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न, बायोटिन, व्हिटॅमिन C, बायोटिन, ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स, कॅलरीज


  100 मिली दुधामधील न्यूट्रिएंट्स
  म्हैस : कॅलरी 97, प्रोटीन 3.7 ग्रॅम, फॅटी 6.9 ग्रॅम, पाणी 84%, लॅक्टोस 5.2 ग्रॅम, मिनरल्स 0.79 ग्रॅम
  गाय : कॅलरी 61, प्रोटीन 3.2 ग्रॅम, फॅट 3.4 ग्रॅम, पाणी 90%, लॅक्टोस 4.7 ग्रॅम, मिनरल्स 0.72 ग्रॅम


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, शरीरयष्टीसाठी म्हशीचे दूध चांगले का?

 • for muscular body buffalo milk or cow milk

  शरीरयष्टीसाठी म्हशीचे दूध चांगले का?
  1. प्रोटीन

  म्हशीच्या दुधामध्ये गायीच्या दुधापेक्षा जास्त प्रोटीन असते. हे मसल्स स्ट्राँग आणि हेल्दी बनवते.


  2. कॅलरी
  म्हशीच्या दुधामध्ये गायीच्या दुधापेक्षा जास्त कॅलरी असतात. यामुळे मसल्सची ग्रोथ जलद होते.


  3. फॅट
  म्हशीच्या दुधामध्ये गायीच्या दुधापेक्षा दुप्पट फॅट असते. हे मसल्स डेव्हलपमेंटसाठी गरजेचे आहे.


  4. कोलेस्टेरॉल
  म्हशीच्या दुधामध्ये गायीच्या दुधापेक्षा कमी कोलेस्टेरॉल असते. हे हार्ट डिसिजपासून बचाव करते.

 • for muscular body buffalo milk or cow milk

  5. मिनरल्स
  म्हशीच्या दुधामध्ये कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फोरस सारखे मिनरल्स गायीच्या दुधापेक्षा जास्त असतात.


  6. व्हिटॅमिन
  म्हशीच्या दुधामध्ये रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन A,C आणि थायमीन जास्त प्रमाणात असते.


  7. अॅमिनो अॅसिड्स : म्हशीच्या दुधामध्ये गायीच्या दुधापेक्षा अनेक हेल्दी अॅमिनो अॅसिड्स जास्त असतात. यामुळे मसल्स स्ट्राँग होतात.

Trending