Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | fruit juice health benefits in marathi

या फळांचे ज्यूस घेतल्याने नष्ट होतील गंभीर आजार, प्रत्येकाचे खास महत्त्व

हेल्थ डेस्क | Update - Jul 28, 2018, 11:36 AM IST

वेगवेगळ्या फळांचा रस वेगवेगळ्या आरोग्य समस्यांवर गुणकारी ठरतो हे शास्त्रीय पातळीवर सिद्ध झाले आहे.

 • fruit juice health benefits in marathi

  वेगवेगळ्या फळांचा रस वेगवेगळ्या आरोग्य समस्यांवर गुणकारी ठरतो हे शास्त्रीय पातळीवर सिद्ध झाले आहे. फळांमध्ये असे अनेक गुण आणि घटक असतात. जे आजार बरा करण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात. फळांचा रस हा आरोग्यासाठी षोषक असतो हे सर्वज्ञात आहे. अमेरिकेत अलीकडेच झालेल्या एका संशोधनानुसार कोणता रस कोणत्या समस्येवर गुणकारी ठरतो याचा खुलासा करण्यात आला आहे.


  सफरचंदाचा रस
  सफरचंदाच्या रसात अँसेटालकोलीन नावाचे रसायन स्मरणशक्ती वाढवतो आणि मेंदूची कार्यप्रणाली सक्षम ठेवतो. अमेरिकेत उंदरावर झालेल्या संशोधनात हे सिद्ध झाले आहे की यामुळे अल्झायमरचा (स्मृतिभ्रंश)धोका कमी होतो. नियमितपणे सफरचंदाचा रस पिणे युवकांसाठी फायद्याचे ठरते.


  इतर फायदे : सफरचंद फायबरचा चांगला स्रोत आहे. याच्यामुळे पचन प्रणाली सुधारते आणि अपचनाची समस्या होत नाही.


  संत्र्याचा रस
  संत्र्यामध्ये मोठय़ा प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असते. हेस्पेरीडिन नावाच्या अँटिऑक्सिडेंटमुळे रक्तवाहिन्या निरोगी राहतात. ज्यामुळे हृदयासंबंधी आजार होण्याची शक्यता कमी होते. हा रस सायट्रेटचा चांगला स्रोत आहे. आंबट फळांमध्ये हा घटक मोठय़ा प्रमाणात आढळतो.


  इतर फायदे : किडनीस्टोन(मूतखड्याची) शक्यता कमी होते. त्याचप्रमाणे रक्तदाब नियंत्रणात राहतो.


  अननसाचा रस
  यात आढळणारे ब्रोमेलेन एंजाइम आहारातील प्रोटीन पचवण्यासाठी मदत करतात. रिकाम्यापोटी हा रस पिल्यास यातील ब्रोमेलेन एंजाइम अँटिअन्फ्लेमेटरी एजंट म्हणून काम करतात. यामुळे सांध्यात येणारी सूज आणि दुखण्याची समस्या कमी होते.


  इतर फायदे : सर्दी, पडसे, कफ या आजारात अननसचा रस अत्यंत उपयुक्त ठरतो.


  नारळ पाणी
  हा एखाद्या एनर्जी ड्रिंक्सपेक्षा कमी नाही. म्हणून शारीरिक कसरत केल्यानंतर नारळ पाणी पिण्यास प्राधान्य द्यावे.जास्त शारीरिक श्रम केल्यानंतर घामावाटे निघालेल्या पाण्याचे प्रमाण कायम राखण्यासाठी हा चांगला पर्याय ठरतो. यात असणारे इलेक्ट्रोलाइटस मिठाचा पुरवठा करतात.


  इतर फायदे : रक्तातील साखरेचा स्तर संतुलित ठेवणे, एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवणे.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन फळांच्या रसाचे फायदे...

 • fruit juice health benefits in marathi

  डोळ्याची कार्यक्षमता वाढेल : गाजराचा रस दररोज पिणे डोळ्यासाठी चांगले असते. यात अधिक प्रमाणात व्हिटामिन ए असते. जे डोळ्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते.

 • fruit juice health benefits in marathi

  नैसर्गिक रक्त शुद्धीकरण : रिकाम्या पोटी तीन ते चार चमचे कोरफडीचा रस प्यावा. कारण यामुळे रक्त शुद्धीकरण होते आणि त्वचेसंबंधी आजार होत नाहीत.

Trending