आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Beauty Tips: ग्रीन टीचे 10 सौंदर्य फायदे, एकदा अवश्य ट्राय करा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेडिकल ऑफ जॉर्जियाच्या संशोधनानुसार ग्रीन टीमध्ये असे अँटीऑक्सीडेंट्स असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. ग्रीन टी चेहरा किंवा केसांवर अप्लाय केल्याने अनेक प्रॉब्लम दूर होतात. ग्रीन टी उकळून याच्या टी बॅग्स यूज केल्या जाऊ शकतात. ब्यूटी एक्सपर्ट निक्की बावा सांगत आहेत ग्रीन टीचे असेच यूज जे सुंदरता वाढवण्यात तुमची मदत करतील...

- उकळलेल्या ग्रीन टीच्या पानांमध्ये मध आणि लिंबूचा रस मिसळून चेह-यावर लावा. याने चेह-याचा रंग उजळतो. हे चेह-याचे डाग-दूर करण्यात इफेक्टिव आहे.

- फ्रिजमध्ये ठेवलेल्या ग्रीन टी बॅग्स पंधरा मिनिट डोळ्यांवर ठेवा आणि काढून घ्या. हे डार्क सर्कल दूर करण्यात मदत करते.

- ग्रीन टीचे पानं बारीक करुन त्यामध्ये दही, हळद पावडर मिसळा. हे चेह-यावर वीस मिनिटे लावून ठेवा आणि धुवून घ्या. हे रिंकल्स टाळण्यात मदत करते.

- ग्रीन टी पाण्यात टाकून उकळून घ्या. हे पाणी गार करुन कापसाने चेह-यावर लावा. हे पिंपल्स दूर करण्यात इफेक्टिव आहे.

- ग्रीन टी पाण्यासोबत उकळून गार करा. यामध्ये बदाम तेल मिसळून कापसाच्या मदतीने चेह-यावर लावा. याने त्वचेची इलास्टिसिटी वाढते. हे चेह-याचा ग्लो वाढवण्यात मदत करते.

- ग्रीन टी पाण्यासोबत उकळून गार करा. शाम्पूनंतर या पाण्याने केस धुवून घ्या. यामुळे केस गळती दूर होते आणि केसांची चमक वाढते.

- ग्रीन टी पाणी टाकून उकळा. हे फ्रिजमध्ये ठेवून गार करा. आता त्वचेवर अप्लाय करा. याने सन टॅनिंग दूर होते.

- ग्रीन टीच्या पानांमध्ये बेकिंग सोडा आणि मध मिसळून चेह-यावर लावा. यामुळे स्किन टाइट होते. हे चेह-याची चमक वाढवण्यात मदत करते.


- ग्रीन टीचे पाऩं बारीक करुन त्यामध्ये दही आणि लिंबूचा रस मिसळा. हे केसांवर लावल्याने कोंडा दूर होतो.


- तांदूळाच्या पिठामध्ये ग्रीन टीचे पानं बारीक करुन मिसळा. हे त्वचेवर अप्लाय करा आणि सुकल्यानंतर धुवून घ्या. यामुळे डेड स्किन दूर होतात. हे फेयरनेस वाढवण्यात मदत करते.