आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळ्यात फक्त 1 कप लवंग चहा तुम्हाला ठेवते हेल्दी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्थ डेस्क : पावसाळ्यात व्हायरल इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. अशा वेळी आपण रोज सकाळी लवंगाचा चहा प्यायला तर अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव करण्यात मदत होते. आयुर्वेदात लवंगाच्या चहाचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेदचे डॉ. गोविंद पारिक सांगतात की, यामुळे व्हायरल इन्फेक्शनसोबतच अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव होतो.

 

सर्दी-पडस्यापासून बचाव लवंग ही गरम असते. यामुळे पावसाळ्यात किंवा बदलत्या वातावरणात लवंगेची चहा प्यायल्याने सर्दी, खोकला आणि पडस्यापासून बचाव होतो.
पचनक्रिया सुरळीत पावसाळ्यात पोट खराब होणे एक सामान्य समस्या असते. अशा वेळी लवंगेचा चहा प्यायल्याने पोटासंबंधीत अनेक समस्या दूर होतात.
दातदुखीपासून आराम दाताच्या वेदना दूर करण्यासाठी लोक अनेक वेळा लवंगेच्या तेलाचा वापर करतात. अशा वेळी लवंगेच्या चहानेही आराम मिळू शकतो. हे तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करुन हिरड्यांना हेल्दी ठेवते.
घश्याच्या समस्या दूर यामुळे कफ आणि घशाच्या समस्यांपासून आराम मिळतो. हे इन्फेक्शनपासून बचाव करते आणि घसा स्वच्छ ठेवते.
का आहे फायदेशीर
  • - लवंगमध्ये पोटॅशियम, सोडियम, फॉस्फोरस, लोह, मँगनीज, आहार फायबर, आयोडीन, व्हिटॅमिन K आणि C, ओमेगा-3 फॅटी अॅसिड, कॅल्शियम आणि मॅग्नीशियम भरपूर प्रमाणात असते. यामुळे हे एका अँटी-ऑक्सीडेंट, अँटी-सेब्टिक, अँटी-इन्फेलमेटरी आणि एनाल्जेसिक सारखे काम करते.
    - यामध्ये यूगेनॉल असते. जे शरीरात साखरेचे प्रमाण नियंत्रित करते. यामुळे डायबिटीजचा धोका कमी होतो.
असे बनवा? एक कप पाणी(50ml) मध्ये 5 किंवा 5 लवंग बारीक करुन टाका. यामध्ये चिमुटभर चहापत्ती मिसळून 5 किंवा 8 मिनिटे उकळा. कोमट झाल्यावर हे चहाप्रमाणे प्या.

बातम्या आणखी आहेत...