आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुर्वेद : कोथिंबीर खाल्ल्याने दूर होते कमजोरी, होतात इतरही आरोग्य लाभ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पदार्थाची चव वाढवण्यासाठी कोथिंबीरचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. परंतु यामध्ये उपलब्ध असलेले कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, केरोटीन, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन C विविध प्रकारच्या आरोग्य समस्या दूर करण्यास सहायक ठरतात. आयुर्वेद एक्स्पर्ट डॉ. गायत्री तैलंग यांनी कोथिंबीर खाण्याचे 10 फायद्यांविषयी खास माहिती दिली आहे.


- कमजोरी
2 चमचे कोथींबीर रसामध्ये 2 चमचे बारीक खडीसाखर अर्धा कप पाण्यामध्ये मिसळून घ्या. हे मिश्रण सकाळ-संध्याकाळ घ्यावे. यामुळे कमजोरी आणि चक्कर येण्याची समस्या दूर होईल.


- डायजेशन
कोथिंबीरीचे पानं ताकामध्ये टाकून सेवन करावे. यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होईल.


- झोप न येणे 
कोथिंबीरचा रस आणि खडीसाखर सामान प्रमाणात घेऊन पेस्ट तयार करा. ही पेस्ट 2-2 चमचे सकाळ-संध्याकाळ पाण्यातून घ्या. झोप न येण्याची समस्या दूर होईल.


- श्वसनाचा आजार
दम लागणे, खोकला किंवा दम्याचा त्रास असल्यास कोथिंबीर आणि खडीसाखर समान प्रमाणात घेऊन पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट नियमितपणे खाल्ल्यास फायदा होईल.


डोळ्यांची शक्ती
कोथिंबीरमध्ये व्हिटॅमिन A भरपूर प्रमाणात असते. याचे नियमित सेवन केल्यास डोळ्यांची शक्ती वाढते.


- टायफाईड
कोथिंबीरचा रस घेतल्यास टायफाईडमध्ये आराम मिळेल.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोथिंबीर खाण्याचे इतर 4 फायदे...

बातम्या आणखी आहेत...