Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | health benefits of vidyache paan

विड्याच्या पानाचे आहेत खास आरोग्य लाभ, कदाचित तुम्हाला माहिती नसतील

हेल्थ डेस्क | Update - Jul 30, 2018, 12:04 AM IST

जेवण केल्यानंतर पान खाणे भारतीयांना खूप आवडते. हिरवे पान अनेक पद्धतीने खाल्ले जाते, परंतु हेच पान आरोग्यासाठीही खूप फायद

 • health benefits of vidyache paan

  जेवण केल्यानंतर पान खाणे भारतीयांना खूप आवडते. हिरवे पान अनेक पद्धतीने खाल्ले जाते, परंतु हेच पान आरोग्यासाठीही खूप फायद्याचे असते, हे फार कमी लोकांना माहिती आहे. हिरव्या नागवेलीच्या पानात अनेक औषधी गुण असतात. त्यामुळेच पान खाणे आरोग्यासाठी खूप फायद्याचे मानले जाते. जाणून घेऊया पान खाण्याचे फायदे...


  पायरियावर उत्तम इलाज
  दातांमध्ये पायरियाची समस्या असेल तर पानात १० ग्रॅम कापूर घालून चावा. नियमित खाल्ल्याने लवकरच ही समस्या संपुष्टात येईल. यामुळे तोंड आल्यासही लवकर आराम मिळतो.


  किडनीसाठीही फायद्याचे
  किडनी खराब झाली असेल तर पानाचे सेवन फायद्याचे ठरते. तथापि, यासोबत तिखट मसाले, दारू आणि मांसाहार करू नये.


  सर्दी-खोकला होतो दूर
  सर्दी झाल्यास पान लवंगेसोबत खाणे फायद्याचे आहे. खोकला दूर करण्यासाठी ओव्यासोबत चावून पान खाल्ले पाहिजे.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन फायदे...

 • health benefits of vidyache paan

  पचनक्रिया सुधारते 
  हिरवे पान चावून खाल्ल्यास त्यापासून बनलेल्या लाळेने पचनक्रिया सुधारते. भारताच्या अनेक राज्यांत जेवणानंतर पान खाण्याची परंपरा आहे. 

 • health benefits of vidyache paan

  तांेडाच्या कॅन्सरपासून बचाव 
  पानात असलेले अॅस्कॉर्बिक अॅसिड या अँटिऑक्सिडंट घटकामुळे शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी होतात. यामुळे तोंडाच्या कॅन्सरपासूनही बचाव होतो. 

Trending