आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Health: कफची समस्या सतावयेत का? ट्राय करा हे 10 सोपे घरगुती उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदलत्या वातावरणात सर्दी-पडसे, खोकला, घश्यातील खवखवसारखी समस्या होणे सामान्य गोष्ट आहे. या लहान-मोठ्या समस्यांसाठी हेवी मेडिसिन घेतल्यास नुकसान होऊ शकते. दिल्लीच्या डायटीशियन रुपाली तिवारी या हेल्थ प्रॉब्लमसाठी काही घरगुती उपाय करण्याचा सल्ला देतात. त्यांच्यानुसार काही पदार्थ अँटी बॅक्टेरियल आणि अँटी बायोटिकप्रमाणे काम करतात आणि बॉडीची इम्युनिटी वाढवून सर्दी-पडसे, घश्यातील खवखव सारख्या समस्यांपासून आराम देतात.
 

1. तुळस
एक कप गरम पाण्यात 5-6 तुळशीचे पान उकळा. हे गार करुन दिवसातून 2-3 वेळा प्या.

2. मेथीदाना
मेथीदाने पाण्यात उकळून दिवसातून 2 वेळा प्या. फायदा मिळेल.

3. मिरे
एक चमचा मधामध्ये चिमुभर मिरपुड मिसळून घ्या. असे दिवसातून 2 वेळा केल्याने सर्दी-खोकला दूर होईल.

4. अद्रक
एक चमचा अद्रक पावडर एक कप पाण्यात उकळून प्या. हे इन्फेक्शन आणि व्हायरसपासून बचाव करते.

5. हळद
दूधामध्ये हळद मिसळून सकाळ-संध्याकाळ प्या. यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरसपासून आराम मिळतो.

6. गुळ
एक-एक तुकडा गुळ आणि अद्रक बारीक करा. यामध्ये एक चमचा तुळशीचा रस मिसळून गरम करा. हे दिवसातून 2 किंवा 3 वेळा खा. आराम मिळेल.

लिंबू पाणी आणि मनुके
मुठभर मनुके पाण्यात उकळा. यामध्ये अर्धा चमचा लिंबू पाणी मिसळून दिवसातून 2 वेळा प्या.
 

मनुके आणि अद्रक
अर्धा मुठ मनुके आणि एक चमचा अद्रक पावडर पाण्यात उकळून प्या. आराम मिळेल.

मनुके, अद्रक, लिंबू पाणी
एक चमचा मध आणि अर्धा चमचा अद्रक पावडर एक कप कोमट लिंबू पाण्यात मिसळून प्या. फायदा मिळेल.


द्राक्ष

अर्धा कप द्राक्षांच्या ज्यूसमध्ये अर्धा चमचा पाणी मिसळून सकाळ-संध्याकाळ प्या. आराम मिळेल.

बातम्या आणखी आहेत...