Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | home remedies for rain diseases In marathi

पावसाळ्यातील आजारांपासून अगदी सहज होऊ शकतो बचाव, करा हे उपाय

हेल्थ डेस्क | Update - Aug 01, 2018, 12:52 PM IST

पावसाळ्यात वातावरण बदलताच अनेक आरोग्य समस्या होतात. या वातावरणात शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमजोर होते.

 • home remedies for rain diseases In marathi

  पावसाळ्यात वातावरण बदलताच अनेक आरोग्य समस्या होतात. या वातावरणात शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमजोर होते. वातावरणात ओलावा असल्यामुळे व्हायरस आणि बॅक्टेरिया असणारे आजार जास्त पसरतात...


  कसा करावा बचाव?
  या वातावरणात होणाऱ्या आजारांवर मेडिकलमधील आैषधे घेण्याऐवजी घरगुती उपाय केले जाऊ शकतात. जास्तीत जास्त आजार हे घरातील अस्वच्छता, अयोग्य पदार्थ खाणे आणि घरातील काही गोष्टींच्या वापराने होत असतात. ही कारणे शोधली तर आपल्याला या आजारांपासून बचावही करता येतो.


  काही आजार आणि उपाय
  1. सर्दी-पडसे
  एक कप पाण्यात एक तुकडा अद्रक, 3-4 लवंग, तुळशीची 4-5 पाने टाकून उकळून घ्या. एक चमचा मध मिसळून प्या.


  2. ताप
  सुंट, पिप्पली आणि मिरे समान प्रमाणात घेऊन बारीक करा. ही अर्धा चमचा पावडर सकाळ संध्याकाळ मधासोबत घ्या.


  3. डोळ्यांचे इन्फेक्शन
  रात्री मातीच्या भांड्यात त्रिफळा पावडर भिजवा. सकाळी हे गाळून या पाण्याने डोळे धुवा.


  4 कानात किडा जाणे
  मोहरीच्या तेलामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकून गरम करा. हे कोमट करून 3-4 थेंब कानात टाकावे.


  5. खाज, त्वचारोग
  लिंबाचे पान पाण्यात उकळून या पाण्याने अंघोळ करा. नंतर खोबऱ्याच्या तेलात कापूर मिसळून त्वचेवर लावा.


  6. पोट खराब होणे
  एक वाटी दह्यामध्ये एक चमचा बारीक केलेली मेथीदाण्याची पावडर आणि एक चमचा भाजलेली जिरा पावडर टाकून खा.


  7. डोक्यात खाज : मेथीदाणा रात्रभर भिजवून सकाळी बारीक करा. यामध्ये लिंबूचा रस मिसळून डोक्यावर लावा. कोमट पाण्याने धुवून घ्या.


  8. अपचन
  ओवा, जिरा आणि हिंग समान प्रमाणात भाजून घ्या. बारीक करून अर्धा चमचा पावडर सकाळ-संध्याकाळ कोमट पाण्यासोबत घ्या.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन आजार आणि त्यावरील उपाय...

 • home remedies for rain diseases In marathi

  9. पोट कळ 
  हळद, मेथीदाणा आणि सुंट समान प्रमाणात बारीक करा. रोज एक चमचा सकाळ-संध्याकाळ कोमट पाण्यासोबत घ्या. 

 • home remedies for rain diseases In marathi

  10. कफ, खोकला 
  एक कप पाण्यात एक अद्रकचा तुकडा, मुलैठी, 3-4 लवंग टाकून उकळून घ्या. लिंबूचा रस आणि मध मिसळून प्या. 

Trending