वाढते वजन नियंत्रणात / वाढते वजन नियंत्रणात आणण्यासाठी मदत करतील हे घरगुती उपाय

हेल्थ डेस्क

Jul 31,2018 10:17:00 AM IST

पूर्वी आयुष्य वयाच्या चाळीशीनंतर सुरू होते, असे म्हटले जायचे; परंतु आता हा टप्पा बदलत्या जीवनशैलीत अनेक रोग, व्याधींचे माहेरघर बनला आहे. व्यक्ती पंचेचाळीसकडे झुकली की त्याला आरोग्यदायी जीवन जगण्याची इच्छा निर्माण होते. अर्थातच, या सगळ्या गोष्टी उशिरा सुचलेले शहाणपण आहे, असे नवीन संशोधनही आता सांगू लागले आहे.


आधुनिक जीवनामध्ये मनुष्याच्या मनावर येणारा ताणतणाव हा मोठा घातक घटक ठरत असून ताणतणावाचा दुष्परिणाम म्हणजे वाढणारे वजन, वाढणार्‍या वजनाचा दुष्परिणाम म्हणजे येणारा थकवा, न्यूनगंड इत्यादी. हा ताणतणाव नुसतेच वजन वाढवत नाही तर बर्‍याच आजारांना आमंत्रणही देतो. उदा. डायबिटीस, ब्लड प्रेशर, डिप्रेशन इत्यादी. वाढते वजन नियंत्रणात आणण्यासाठी काही उपाय सांगत आहोत.


पनीर -
वाढत्या वयाबरोबर स्नायू कमजोर होऊ लागतात. यामुळे चयापचय प्रक्रिया क्षीण होते. व्हे-प्रोटीनपासून बनलेल्या कॉटेज पनीरमुळे स्नायू कणखर बनतात. याच्या सेवनाने वजन नियंत्रणात राहते.


काळे सोयाबीन -
काळ्या सोयाबीनच्या सेवनाने स्तनाचे कर्करोग होण्याची शक्यता कमी असते. हे खाल्याने चरबी वेगाने कमी करता येऊ शकते आणि वजनावरही नियंत्रण मिळवता येते.


क्रोड -
अक्रोडमधील प्रोटीन आरोग्यदायी आहे. हे सडपातळ होण्यासाठी चांगले असते. अक्रोड टरफलासोबतच खावे. टरफलासोबत खाल्याने जास्त खाण्याची इच्छा होणार नाही आणि शरीरासही नुकसान होणार नाही.


इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

तिखट - तिखटात चरबी कमी करणारे कॅस्पिनॉइड असते. 2009 मध्ये अमेरिकेत करण्यात आलेल्या एका संशोधनात एका स्वयंसेवकाने दररोज 6 ग्रॅम कॅस्पिनॉइड ऑइलचे सेवन केले. त्यामुळे त्याचे वजन 5 पट वेगाने कमी झाले.कंबरेची चिंता सोडा, बटाटे खा - बटाटा खाणे कंबरसाठी सर्वाधिक घातक असते, असे हार्वर्डच्या एका अभ्यासात सांगण्यात आले आहे, परंतु त्यांनी ते तळलेल्या बटाट्याबद्दल सांगितले आहे. भाजलेल्या किंवा उकळलेल्या बटाट्यावर काळी मिरी आणि मीठ टाकून खाणे चांगला आहार आहे. कॉबरेहायड्रेटचे प्रमाण अधिक असलेल्या या आहारात क जीवनसत्त्वाचेही जास्त प्रमाण आढळून येते. रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी हे उपयुक्त आहे. बटाटे उकळून दह्यासोबत खाल्याने नुकसान होत नसल्याचे आहारातज्ज्ञ निलांजना सिंग यांनी सांगितले आहे.

तिखट - तिखटात चरबी कमी करणारे कॅस्पिनॉइड असते. 2009 मध्ये अमेरिकेत करण्यात आलेल्या एका संशोधनात एका स्वयंसेवकाने दररोज 6 ग्रॅम कॅस्पिनॉइड ऑइलचे सेवन केले. त्यामुळे त्याचे वजन 5 पट वेगाने कमी झाले.

कंबरेची चिंता सोडा, बटाटे खा - बटाटा खाणे कंबरसाठी सर्वाधिक घातक असते, असे हार्वर्डच्या एका अभ्यासात सांगण्यात आले आहे, परंतु त्यांनी ते तळलेल्या बटाट्याबद्दल सांगितले आहे. भाजलेल्या किंवा उकळलेल्या बटाट्यावर काळी मिरी आणि मीठ टाकून खाणे चांगला आहार आहे. कॉबरेहायड्रेटचे प्रमाण अधिक असलेल्या या आहारात क जीवनसत्त्वाचेही जास्त प्रमाण आढळून येते. रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी हे उपयुक्त आहे. बटाटे उकळून दह्यासोबत खाल्याने नुकसान होत नसल्याचे आहारातज्ज्ञ निलांजना सिंग यांनी सांगितले आहे.
X
COMMENT