आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Health: सौंदर्यासाठी वरदान आहे तुप, अशा प्रकारे वापर केल्याने उजळेल रुप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुर्वेदात तुपाला अमृत म्हटले जाते. जे तरुणपणा टिकवून ठेवून, म्हातारपणाला दूर ठेवते. देशी गायीचे तूप हे शरीराचा विकास आणि रोग दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. याचे सेवन केल्याने शक्ती, वीर्य आणि आयुष्य वाढते. अॅसिडीटी दूर होते. हे त्वचेसाठी एक वरदान आहे. आज आपण जाणुन घेऊया तुपाचा कसा वापर केल्याने स्किन ग्लोइंग होते...

 

1. स्किन स्मूथ होते
तूप हे ड्राय स्किनला सॉफ्ट बनवते. हे त्वचेच्या कोशिकांपर्यंत सहज पोहोचते. याचा वापर करण्यासाठी तुप थोडेसे कोमट करुन घ्या आणि 5 मिनिट या तुपाने मसाज करा. अर्ध्या तासानंतर अंघोळ करुन घ्या.

 

2. चेह-यासाठी मॉश्चरायजरचे काम
हे तुमच्या नाजूक चेह-यासाठी मॉश्चरायजरचे काम करते. आपल्या हातात तुप आणि पाणी समान प्रमाणात घ्या आणि हे या मिश्रणाने चेह-याची मसाज करा. हे 15 मिनिट राहू द्या आणि नंतर गार पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून 2-3 वेळा असे अवश्य करा. चेहरा एकदम सॉफ्ट होईल.

 

3. चमकदार चेह-यासाठी
तुम्हाला स्किन शायनी बनवायची असेल चेह-याला तुप लावा.. तुपामुळे चेह-याचा नैसर्गिक ग्लो टिकून राहतो. तुपाने चेह-याची 20 मिनिट मसाज करा आणि 20 मिनिटांनंतर कोमट पाण्याने धुवून घ्या.

 

4. सुरकूत्या दूर होतात
तुप एक बेस्ट अँटीएजिंग प्रोडक्ट आहे. जर तुपाने नियमित चेह-यावर मसाज केली तर कोशिका निरोगी राहतील आणि तुम्ही तरुण दिसाल. 

 

5. डार्क सर्कल
रात्री झोपण्यापुर्वी डोळ्यांखाली तुप लावा. दुस-या दिवशी सकाळी साध्या पाण्याने डोळ्यांना धुवून घ्या. असे रोज केल्याने तुम्हाला अवश्य फरक जाणवेल.
 

6. थकलेल्या डोळ्यात फ्रेशनेस येते
तुप हे डार्क सर्कल दूर करण्यासोबत डोळ्यातील थकवा दूर करते. डोळ्यांच्या चारही बाजूंनी तूप लावून मसाज केल्याने ब्लड सर्कुलेशन जलद होते ज्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो आणि थकवा दूर होतो.

 

7. फाटलेल्या ओठांना चांगले करते
फाटलेल्या ओठांवर शुध्द तुपाने मसाज केल्याने ही समस्या दूर होते. काळे ओठ गुलाबी होतात.

बातम्या आणखी आहेत...