आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Numbers And Symbols Given Below The Plastic Bottles And Other Such Products Bears A Significant Information

प्‍लास्टिकच्‍या बॉटलमधील पाणी पिण्‍यापूर्वी अवश्‍य पाहा हा नंबर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जितके समज-गैरसमज, कन्‍फ्युजन, शंका प्रेमाविषयी असतील तितकेच समजगैरसमज प्‍लास्टिकच्‍या वापराविषयी  आहेत. प्‍लास्टिक बॉटल्‍स, कॅरीबॅग, वस्‍तू यांचा वापर करावा कि करू नये याविषयी अनेकांच्‍या मनात गोंधळ असतो.


विशेष म्‍हणजे जितका प्रेमाविषयी सल्‍ला देण्‍यास लोक कचरतात तितकेच ते प्‍लास्टिकविषयी सांगण्‍यासही कचरतात. कारण बहुतांश जणांना प्‍लास्टिकचा वापर न करणे किंवा त्‍याऐवजी पर्यायी वस्‍तूचा वापर करणे अवघड जाते. मात्र येथे आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत की, कोणत्‍या प्‍लास्टिकचा वापर करणे टाळले पाहिजे. ते तुमच्‍यासाठी धोकादायक ठरू शकतात. मात्र कोणत्‍या प्रकारच्‍या प्‍लास्टिकचा वापर करणे योग्‍य आहे, हे मात्र आम्‍ही तुम्‍हाला सांगू शकणार नाहीत. कोणीही तुम्‍हाला असे सांगू शकणार नाहीत. कारण प्रत्‍येक प्रकारच्‍या प्‍लास्टिकमध्‍ये कोणता ना कोणता घातक घटक म्‍हणजेच टॉक्सिक असू शकतो. जे हानिकारक असू शकतात. त्‍यामुळे कोणत्‍याही प्रकारच्‍या प्‍लास्टिकचा वापर करणे टाळले पाहिजे. कारण शॉर्ट टर्ममध्‍ये हे जरी फायदेशीर असले तरी लॉंग टर्ममध्‍ये यामुळे नुकसान होते.


मात्र तरीही तुम्‍हाला प्‍लास्टिकचा वापर करायचाच असेल तर त्‍याविषयी बेसिक माहिती असणे आवश्‍यक आहे.


# रेज़ीन आइडेंटिफिकेशन कोड
प्‍लास्टिकच्‍या प्रत्‍येक डब्‍ब्‍यावर, कंटेनर, बादली आणि बॉटलवर एका त्रिकोणामध्‍ये एक नंबर दिलेला असतो. यालाच रेजीन आयडेंटिफिकेशन कोड म्‍हणतात.  रेजीन म्‍हणजे ज्‍या पदार्थाने प्‍लास्टिक बनलेले आहे. बहुतांश वेळेस हा नंबर डब्‍बा आणि बॉटलीच्‍या खाली असतो. मात्र ब-याचदा हा नंबर वेगळ्या भागावरही असतो.  

 

या कोड वरून प्‍लास्टिकचे ती वस्‍तू बनवण्‍यासाठी कोणत्‍या गोष्‍टीचा वापर केला गेला, हे आपण जाणून घेऊ शकतो. आणि यावरूनच प्‍लास्टिकची ती वस्‍तू वापरणे हानिकारक आहे की नाही, याची माहिती मिळते. मात्र लक्षात ठेवा हे कोड अधिकृतरीत्‍या सुरक्षीततेची पृष्‍टी करत नाही.  1 ते 6 कोड विशिष्‍ट 'प्‍लास्टिक पॉलिमर'विषयी माहिती देतात. तर 7 या कोडमध्‍ये 1 ते 6 कोडमध्‍ये समाविष्‍ट नसलेल्‍या इतर सर्व प्‍लास्टिक्सचा समावेश असतो.

 

पुढील स्‍लाइडवर प्रत्‍येक कोडनूसार जाणून घ्‍या, कोणत्‍या प्‍लास्टिकने बनलेल्‍या असतात वस्‍तू आणि त्‍या वापराव्‍यात की नाही....

बातम्या आणखी आहेत...