आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयुर्वेदामध्ये आवळ्याचा उपयोग विविध आजारामंध्ये केला जातो. आवळा हे फळ हिवाळ्यामध्ये येत असले तरी त्यापासून मोरावळा (मुरंबा)तयार करून तो मग वापरण्याची एक पद्धत आहे. जो कोणी याचे नियमित सेवन करेल, त्याची जीवनशक्ती प्रचंड वाढते, तो निरोगी राहू शकतो. आवळ्याच्या सेवनाने मेंदू पुष्ट, श्वासरोग दूर व हृदय मजबूत होते. नेत्रदृष्टी व आतड्यांची कार्यशक्तीत वृद्धी होते. यकृत स्वस्थ होऊन पचनशक्ती वाढते. आवळा रक्तशुद्धीकरण व रक्ताभिसरणातही गुणकारी असून विर्याचा स्रोत आहे. हा आयुष्यवर्धक तसेच सात्विक वृत्ती जागृत करून ओज कांती वाढविणारा आहे.
1- आवळ्याचा रस खडीसाखरेबरोबर दिला असता डोकेदुखी, पोट, छाती व गळ्यातील आग, चक्कर तसेच अम्लपित्तामुळे होणारी उलटी व इतर लक्षणे कमी होतात.
2- ज्यांना पोट साफ होण्यास त्रास होतो. मलावरोध असतो, त्यांनी नियमीतपण आवळ्याचा रस अथवा आवळा खावा. याने पोट नियमीतपणे साफ होऊ लागते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, आवळ्याचे इतर काही खास उपाय आणि फायदे...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.