आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्ट अटॅकमुळे झाले या बॉलिवूड अॅक्टरचे निधन, वाचा कमी वयात का होत आहे असे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड ऍक्टर नरेंद्र झा यांचे बुधवारी सकाळी हार्टअटॅकमुळे निधन झाले. ते फक्त 55 वर्षांचे होते, कमी वयात हार्टअटॅक येण्याचे प्रमाण जगभरात वाढत आहे. परंतु भारतामध्ये ही स्थिती जास्त गंभीर आहे. येथे 30 ते 35 वर्ष वय असलेल्या लोकांनाही हार्टअटॅक येण्याचे प्रमाण जास्त आहे. एक्स्पर्टसनुसार आपल्या येथे हार्टअटॅकचे वय वेस्टर्न कंट्रीजच्या तुलनेत 10 वर्षांनी कमी झाले आहे.


एका स्टडीनुसार, आशियायी लोकांमध्ये हार्टअटॅकची शक्यता जास्त राहते. भोपाळ येथील एल एन मेडिकल कॉलेजच्या कार्डियोलॉजी डिपार्टमेंटचे प्रोफेसर आणि कॉर्डियोलॉजिस्ट डॉ. सुब्रतो मंडल यांच्यानुसार बदलती लाइफस्टाइल ही तरुणांमध्ये हृदयाचे आजार वाढवत आहे. विशेषतः भारतामध्ये खराब लाइफस्टाइलमुळे तरुणांना हार्टअटॅक येण्याचे प्रमाण वाढत आहे. एक्स्पर्ट सांगत आहेत यंगस्टर्सला येणाऱ्या हार्टअटॅकची सहा कारणे आणि यापासून दूर राहण्याचे उपाय...