Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Dengue Fever Symptoms

बॉलिवूड गीतकाराचे डेंग्यूमुळे निधन: डॉक्टर म्हणाले- हे आहेत डेंग्यूचे 9 संकेत

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 03, 2018, 12:00 AM IST

'पार्टनर', 'तुमको न भूल पाएंगे', 'तेरे नाम' आणि 'दबंग' सारख्या चित्रपटांचे गाणे लिहिणारे आणि डायलॉग्स रायटर जलीस शेरवान

 • Dengue Fever Symptoms

  बॉलिवूड डेस्क: 'पार्टनर', 'तुमको न भूल पाएंगे', 'तेरे नाम' आणि 'दबंग' सारख्या चित्रपटांचे गाणे लिहिणारे आणि डायलॉग्स रायटर जलीस शेरवान यांनी जगाचा निरोप घेतला आहे. विशेष म्हणजे शेरवानी यांनी सलमान खानच्या जास्तीत जास्त चित्रपटांची गाणी लिहिली आहेत. दैनिक भास्करशी बोलताना त्यांच्या कुटूंबानी सांगितले की, त्यांना डेंग्यू झाला होता.
  रिपोर्ट्सनुसार, जलीस हे जवळपास 2 वर्षांपासून आजारी होती. त्यांना डायबिटीज झाला होता. काही काळापुर्वी त्यांची शुगर लेव्हल वाढली होती.

  वाचा डेंग्यूविषयी
  पावसाळ्यात डेंग्यूच्या पेशेंट्सची संख्या जलद वाढत आहे. सामान्यतः ताप आल्यावर आपण घरातच औषध घेऊन ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतो. परंतु योग्य वेळी डेंग्यूवर उपचार केले नाही तर सीरियस प्रॉब्लम होऊ शकते. का होतो डेंग्यू?

  जनरल फिजीशिनय डॉ. धीरज शुक्ला सांगतात की, एडीज डास चावल्यामुळे डेंग्यूचा ताप येतो. या आजारांवर कोणतीच लस उपलब्ध नाही, यामुळे या डासापासून दूर राहणे हीच डेग्यूंपासून दूर राहण्याची चांगली पध्दत असल्याचे डॉक्टर मानतात. एडीज डास दिवसा चावतो. यामुळे घरात डास होऊ देऊ नका. झाडांच्या कुंड्या, टायर किंवा कूलरमध्ये जमा झालेल्या पाण्यात डास जमा होतात. यामुळे घराच्या आजुबाजूला डास होऊ देऊ नका.


  काय आहेत याचे संकेत?
  डॉ. शुक्ला सांगतात की, सामान्य ताप येणे हा डेंग्यूचा संकेत असतो. परंतु ताप लवकर बरा होत नसेल किंवा इतर काही कॉम्प्लिकेशन दिसले तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉ. शुक्ला सांगत आहेत कोणत्या प्रकारे ओळखावे डेंग्यूचे संकेत...

Trending