Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Health Benefits of Aloe Vera

Aloe Vera:एक चमचा कोरफड...वजन घटण्यास मदत तर योनसंक्रमण प्रतिबंधास लाभदायक

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 01, 2018, 03:27 PM IST

कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे. संस्कृतमध्ये कोरफडला कुमारी आणि इंग्रजीत अॅलो (Aloe) असे संबोधले जाते.

  • Health Benefits of Aloe Vera

    कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे. संस्कृतमध्ये कोरफडला कुमारी आणि इंग्रजीत अॅलो (Aloe) असे संबोधले जाते. कुमारी आसाव हे परंपरागत आर्युवैदिक औषध बनते. कोरफडीचा रस आरोग्यदायी आहे. कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’, ‘बी1’, ‘बी2’, बी3’, ‘बी6’, फॉलिक ॲसिड हे घटक असतात. तर मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असल्याने शरीराला पोषक घटकांचा पुरवठा होतो. त्यामुळे दररोजच्या आहारात कोरफडीच्या रसाचा समावेश करावा अशी काहीची शिफारस आहे.

    वजन घटण्यास मदत होते –

    कोरफडीचा रस प्यायल्याने नैसर्गिकरीत्या वजन घटण्यास मदत होते. कोरफडीच्या रसामुळे मेटॅबॉलिक रेट वाढून वजन घटते. या रसातील अँट-ऑक्सिडंट्स शरीरात पसरलेले फ्री-रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत करतात.

    शरीर डिटॉक्स होते –
    कोरफडीचा रस शरीर डिटॉक्स करण्यास मदत करतो. कोरफडीमध्ये अॅमिनो ॲसिड, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायटोन्यूट्रिन्स हे शुद्धतेचे प्रभावी घटक असतात. आयुर्वेदिक डॉक्टर रक्तातील आणि पचनक्रियेतील विषारी घटक काढून टाकण्यासाठी कोरफडीचा रस पिण्याचा सल्ला देतात.

    सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो. –
    सर्दी आणि खोकल्यावर सुरक्षित आणि प्रभावी घरगुती उपाय म्हणून कोरफडीचा उपयोग केला जातो. याच्यातील अँटि-व्हायरल आणि अंटि-बॅक्टेरियल गुणधर्मामुळे श्वसनाच्या इन्फेक्शनला कारणीभूत असणाऱ्या सूक्ष्मजीवांची वाढ खुंटते. कोरफडीमध्ये मुबलक प्रमाणात मॅग्नेशियम लॅक्टेट असल्याने ते अँटि-हिस्टॅमिनप्रमाणे कार्य करून सायनसच्या लक्षणांवर मात करते.

    संधिवाताच्या वेदना कमी होते. –
    कोरफडीच्या रसामुळे आमवाताच्या (ऱ्हुमेटाईड आर्थरायटिस) रुग्णांना होणाऱ्या वेदना व त्यांच्या सांध्यांमधील ताठरता कमी होण्यास मदत होते. कोरफडीच्या दाहशामक क्षमतेमुळे या वेदना कमी होण्यास मदत होते.

    पचनक्षमता वाढते–
    बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यासाठी कोरफडीचा रस रेचक म्हणून कार्य करतो. कोरफडीच्या रसामुळे आतड्यामधील उपयोगी बॅक्टेरियांची वाढ होते, त्यामुळे आतड्यांची अन्नपचन करण्याची क्षमता वाढून अपचनाचा त्रास कमी होण्यास मदत होते. कोरफडीचा रस प्यायल्याने पित्ताचा त्रास कमी होण्यासही मदत होते.

    योनसंक्रमणास प्रतिबंध होतो. –
    योनीजवळ संक्रमण झाल्यास कोरफडीच्या रसाने त्यावर उपचार करता येतो. कोरफडीमध्ये अँटि-फंगल गुणधर्म असतो. त्यामुळे योनिमार्गाजवळ झालेल्या इन्फेक्शनमुळे होणारी जळजळ, खाज व दाह कमी होण्यास मदत होते.

    दातांचे आरोग्य सुधारते –
    नियमितपणे कोरफडीचा रस प्यायल्याने दातांचे आरोग्य सुधारते, हे अभ्यासानुसार सिद्ध झाले आहे. कोरफडीच्या रसामुळे हिरड्यांना आलेली सूज कमी होते, तसेच प्लाकची निर्मिती रोखण्यास मदत होते. तोंड आलेले असल्यास कोरफडीचा रस तोंडाला लावल्यास आराम मिळतो.

    रोगप्रतिकारक शक्ती वाढते –
    कोरफडीच्या रसामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. या रसामध्ये व्हिटॅमिन ‘सी’ आणि ‘के’, अॅमिनो ॲसिड आणि फायटोन्यूट्रिन्स यांसारखे पोषक घटक असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे इन्फेक्शनपासूनही बचाव होतो.

    पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... एक चमचा कोरफड...लाभ होतील अनेक

  • Health Benefits of Aloe Vera
  • Health Benefits of Aloe Vera
  • Health Benefits of Aloe Vera
  • Health Benefits of Aloe Vera
  • Health Benefits of Aloe Vera
  • Health Benefits of Aloe Vera

Trending