आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

का होतो मुळव्‍याध? या घरगुती उपायांनी दूर होईल ही व्‍याधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मूळव्याध (मोड किंवा पाईल्स) म्हणजे गुदद्वाराच्या आतील भागास असलेल्या अशुद्ध रक्तवाहिन्यांचे सूक्ष्म जाळे तेथील आंतरवर्णासह सैल सुटते त्या वेळी हाताला कसला तरी कोंब किंवा मोड लागतो. ब-याचदा यामध्ये वेदना व रक्तस्राव प्रकट होतो. या स्थितीलाच मूळव्याध असे म्हणतात.


आयुर्वेदिक एक्सपर्ट आणि प्रॅक्टिशनर डॉ. अबरार मुल्तानी सांगतात की, खाणेपिणे आणि लाइफस्टाइलमुळे अनेक लोकांना पाइल्सची समस्या होते. यामागे अनेक अनुवांशिक म्हणजेच फॅमिली हिस्ट्रीसुध्दा असू शकते.


रोग बरा होण्‍यासाठी याच्‍या कारणांना समजून घेणे अतिशय महत्‍त्‍वाचे आहे
1) मलबद्धता : हे या रोगाचे प्रमुख कारण मलप्रवृत्ती कडक होणे व त्यासाठी लावला जाणारा जोर याच्या परिणामी गुद्द्वाराच्या जागी चिरा पडतात आणि हा रोग तयार होतो.
2) प्रवाहिका : सआव मलप्रवृत्ती हे या रोगाचे दुसरे महत्त्वाचे कारण पोटात मुरडा येऊन चिकट फेसाळ मलप्रवृत्ती होणे हे प्रवाहिकेचे प्रमुख लक्षण. बरं, रुग्णाला किमान 4-5 वेळा शौचास जावं लागतं. परिणामी, मोठ्या आतड्यासह गुद्द्वाराची जागा अलवार होते. सुजते परिणामी गुद्द्वाराच्या ठिकाणी जखमा तयार होतात.
3) मूळव्याधचा त्रास : बहुतांश मूळव्याध असणार्‍या रुग्णांना फिशरचा त्रास दिसून आलेला आहे. मूळव्याधीची गाठ व सोबत मलबद्धता परिणामी फिशर उत्पन्न होताना दिसून येते.
4) प्रसूतीच्या वेळी गुदमार्ग ताणला जाऊन व्रण होणे.
5) मूळव्याध शस्त्रकर्म करताना चुकीने व्रण होणे.
6) अतिसार अधिक झाल्याने तसेच अत्याधिक उष्ण औषधीच्या प्रयोगामुळेसुद्धा गुद्द्वाराच्या ठिकाणी जखमा होणे.

 

पुढील 12 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या डॉक्टर मुल्तानी यांनी सांगितलेले आयुर्वेदिक उपाय...

बातम्या आणखी आहेत...