आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत भावाच्‍या वीर्यापासून चुलत बहिणीने दिला जुळ्यांना जन्‍म, जाणुन घ्‍या काय आहे सरोगसी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्‍यात नुकताच एक अनोखा प्रकार घडला. अविवाहित युवक प्रथमेश पाटील याचे ऐन सत्ताविसाव्या वर्षी सप्टेंबर २०१६ मध्ये ब्रेन ट्यूमरने मृत्‍यू झाला होता. मात्र त्‍यापूर्वी जर्मनीतील डॉक्‍टरांच्‍या सल्‍ल्‍याने प्रथमेशने ‘क्रायोप्रिझर्व्हेशन’ पद्धतीने त्याचे वीर्य जतन करून ठेवले होते.


मुलगा अकाली गेल्‍यानंतर त्‍याचे दु:ख पचवणे आई राजश्री पाटील यांच्‍यासाठी सोपे नव्‍हते. मात्र त्‍याची आठवण म्‍हणून त्‍याचे रुप जन्‍माला घालण्‍याचा निर्णय या माऊलीने घेतला. यासाठी संबंधित तरूणाच्‍या चुलत बहिणीनेच 'सरोगेट' मातृत्‍व पत्‍करण्‍याचा निर्णय घेतला. यासाठी जतन करून ठेवलेले वीर्य काळजीपुवर्क पुण्‍यात आणले गेले. नंतर पुरुष व स्त्रीबीजाचे प्रयोगशाळेत फलन करुन भ्रूण तयार करण्‍यात आले. 9 महिन्‍यानंतर सोमवारी 12 फेब्रुवारी, 2018रोजी संबंधित महिलेने दोन जुळ्यांना जन्‍म दिला आणि अशाप्रकारे सरोगसीच्‍या माध्‍यमातून  आई आपल्‍या मुलाचे रूप पुन्‍हा एकदा पाहू शकली.

 

चला तर जाणुन घेऊया, नेमके सरोगसी म्‍हणजे काय व कशी असते ही प्रक्रिया...

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...