आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, नियमितपणे कोथिंबीर खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय आहारात कोथिंबीरचा उपयोग अनेक वर्षांपासुन होत आहे. कोथिंबीर आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते. यामध्ये प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, मिनरल असे अनेक पोषकतत्त्वे असतात. याव्यतिरिक्त कोथिंबरीमध्ये कॅल्शियम, फॉस्फोरस, आयरन, केरोटीन, थियामीन, पोटोशियम आणि व्हिटॅमीन आहेत. कोथिंबीर पोटाच्या समस्यांसाठी फायदेशीर आहे. पचनक्रिया सुरळीत ठेवते. आज आपण कोथिंबीरच्या आरोग्यवर्धक गुणांविषयी माहीती मिळवणार आहोत.


पचनशक्ती वाढते
कोथिंबीर पोटाच्या समस्या दूर करते, पाचनशक्ती वाढवते. ताज्या कोथिंबीरच्या पानांना ताकासोबत प्यायल्याने अपचन, मळमळ अशा अनेक समस्यांपासुन आराम मिळतो. कोथिंबीर, हिरवी मिर्ची, नारळ आणि अदरकची चटणी बनवुन खाल्ल्याने, अपचनामुळे पोटात होणा-या वेदनांपासुन आराम मिळतो. याव्यतीरिक्त अर्ध्या ग्लास पाण्यात दोन चमचे कोथिंबीर टाकुन प्यायल्याने पोट दुखीपासुन आराम मिळतो.


अशक्तपणा दूर
जर तुम्हाला खुुप थकल्या सारखे, अशक्त वाटत असेल किंवा चक्कर येत असतील. तर दोन चमचे कोथिंबीरच्या रसामध्ये 10 ग्राम मिश्री आणि आर्धी वाटी पाणी मिळवा. हे मिश्रण सकाळ संध्याकाळ प्यायल्याने खुप फायदा होतो.


श्वासचे रोग दूर
कोथिंबीर श्वासासंबंधी रोगांना दूर करण्यासाठी खुप फायदेशीर असते. खोकला, दमा किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास कोथिंबीर आणि मिश्री समान प्रमाणात मिळवुन बारीक करा. हे मिश्रण एक चमचा भाताच्या पाण्यात मिळवुन रोग्याला पाजा. काही दिवस नियमीत असे केल्याने आराम मिळेल.


कोथिंबीरचे इतर आरोग्यावर्धक फायदे पुढील स्लाईडवर वाचा...

बातम्या आणखी आहेत...