आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बहुतांश लोकांना माहिती नाहीत जमिनीवर बसून खाल्ल्याने होतात हे 10 फायदे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या काळात बहुतांश लोक टेबल-खुर्चीवर बसून जेवण करतात, परंतु हे आरोग्यसाठी फायदेशीर नाही. प्राचीन काळापासून जमिनीवर बसून जेवण करण्याची प्रथा चालू आहे आणि यामुळे शरीराला विविध लाभ होतात. चित्तौडचे निवृत्त जिल्हा चिकित्सा अधिकारी आयुर्वेदाचार्य रोशनलाल मोड यांच्यानुसार डायनिंग टेबलवर बसून जेवण केल्याने आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात. याउलट जमिनीवर बसून जेवण केल्याने विविध आजारांपासून आपण दूर राहू शकतो. येथे जाणून घ्या, जमिनीवर बसून जेवल्याने कोणकोणते फायदे होतात...


1. जमिनीवर बसून जेवताना आपण एक विशेष योगासनाच्या स्थितीमध्ये असतो. याला सुखासन म्हणतात. हे पद्मासनचे एक रूप आहे. यामुळे शरीराला विविध लाभ होतात.

2. जमिनीवर बसून जेवण केल्याने आपण चांगल्याप्रकारे जेवण करू शकतो.

3. या आसनात बसून जेवण केल्याने एकाग्रता वाढते.

4. सुखासनामुळे संपूर्ण शरीरात रक्तप्रवाह समान रूपात होतो. यामुळे शरीराला जास्त ऊर्जा मिळते.

5. या आसनामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि मनामध्ये सकारात्मक विचारांचा प्रभाव वाढतो.

6.या आसनात बसून जेवण केल्याने आपले पाय मजबूत होतात

7. अशाप्रकारे जेवण केल्याने लठ्ठपणा, अपचन, गॅस इ. पोटाशी संबंधित समस्या दूर राहतात.

8. आळस दूर होतो आणि उत्साह कायम राहतो. मांसपेशींमधील वेदना कमी होतात.

9. जमिनीवर बसून जेवण केल्याने मणक्याच्या हाडाच्या खालील भागावर जोर पडतो, यामुळे शरीराला अराम मिळतो.

10.या आसनात बसून जेवल्याने कंबरदुखीच्या वेदनेतून आराम मिळतो.

बातम्या आणखी आहेत...