आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 2 आजारांवर बचाव हाच आहे उपाय, अन्‍यथा अायुष्‍यभर घ्‍यावी लागतात औषधं

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मधुमेह आणि रक्तदाबाची औषधे आयुष्यभर घ्यावी लागतात
एकदा उच्च रक्तदाबाचा आजार झाल्यास तो आयुष्यभर राहतो. औषधे घ्यावीच लागतात. औषधेच रक्तदाब नियंत्रित ठेवू शकतात. तो बरा करू शकत नाहीत. हीच बाब मधुमेहालाही लागू आहे.


रक्तदाबाचे औषध घेण्यास विसरल्यास काय?
जर कोणी सकाळचा डोस घेण्यास विसरले तर तो लंचच्या वेळी डोस घेऊ शकतो. पण रात्र झाल्यास औषध घेऊ नये. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच घ्यावी. एखाद्या दिवशी औषध न घेतल्यास सामान्य स्थितीत विशेष फरक पडत नाही.  


सडपातळ लोकांनाही मधुमेह होऊ शकतो का?
सडपातळ लोकांनाही मधुमेह होतो. पोटाच्या आसपास जास्त चरबी जमा झाल्याने प्रकार २ मधुमेहाचा धोका वाढतो.


गोड खाल्ल्याने मधुमेह होतो का?
खूप जास्त गोड खाल्ल्याने मधुमेह होत नाही. आणि मधुमेह झाल्यावर गोड खाणे बंद करण्याचीही गरज नाही. संतुलित धान्य, प्रोटीन, हिरव्या भाज्या, फळे आणि कमी फॅटचा आहार घ्यावा.

 

मधुमेह हा आजार आनुवंशिक आहे का?
मधुमेह हा आनुवंशिक आजार आहे. पालकांपैकी कोणाला एकाला असल्यास अपत्यांना होण्याची शक्यता ३०% पर्यंत आहे. आई-वडील दोघांना असल्यास शक्यता ७०%पर्यंत आहे.


पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, कोणत्‍या चुकांमुळे मधुमेह म्‍हणजेच डायबिटीज होण्‍याचा धोका वाढतो...

 

बातम्या आणखी आहेत...