आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरोगेसीद्वारे श्रेयस तळपदे बनला पिता, केवळ अशा लोकांनाच असते परवानगी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्‍थ डेस्‍क- अभिनेता श्रेयस तळपदे आणि त्‍याची पत्‍नी दिप्‍ती यांच्‍या घरी एका मुलीचा जन्‍म झाला आहे. विवाहाच्‍या 14 वर्षांनंतर सरोगेसीद्वारे त्‍यांना ही मुलगी झाली आहे. ते सुट्टयांसाठी हाँगकाँगला गेलेले असताना मुलगी झाल्‍याचे त्‍यांना समजले. तेव्‍हा ते ताबडतोब भारतात परतले. जूनपर्यंत ते आता आपल्‍या मुलीसोबतच राहणार आहेत. यापूर्वीही करण जोहर, शाहरूख खान सरोगेसीद्वारे पिता बनलेले आहेत. येथे सांगत आहोत सरोगेसी या तंत्रज्ञानाविषयी.

 

काय आहे सरोगेसी?
- डॉ. सिंह सांगतात की, ज्यावेळी पति-पत्नी मेडिकली आपत्याला जन्म देण्यास समर्थ नसतात. तेव्हा ते दुस-या महिलेच्या गर्भात आपले स्पर्म आणि एग्स ठेवून बाळ जन्माला घालतात. यालाच सरोगेसी म्हटले जाते.

 

सरोगेसी Surrogacy कायद्याच्या खास गोष्टी कोणत्या?
- हा कायदा जम्मू-काश्मिर राज्य सोडून संपुर्ण भारतात लागू होईल.
- पाच किंवा जास्त वर्षांपासून विवाहित असलेले कपल्स सरोगेसीच्या माध्यमातून पालकत्व स्विकारु शकता.
- विवाहित महिलेचे वय 23 ते 50 आणि पुरुषांचे वय 26 ते 55 च्या मध्ये असावे.
- फक्त भारतीय नागरिकांनाच परवानगी आहे. एनआरआय आणि ओसीआय होल्डरला परवानगी मिळणार नाही.
- सिंगल पेरेंट, हामोसेक्सुअल किंवा लिव्ह-इनमध्ये राहणा-या कपल्सला सरोगसीची परवानगी नाही.
- ज्या लोकांना इनफर्टिलिटीची समस्या असेल फक्त त्यांनाच परवानगी मिळेल.
- सरोगसी द्वारे जन्म घेणा-या बाळाला इतर बाळांप्रमाणे सर्व अधिकार मिळतील.
- सरोगेसीमध्ये पैशांची देवाण-घेवणा चालणार नाही. म्हणजेच कमर्शियल सरोगसी करता येणार नाही.
- सरोगेट मदर ही कपलची नातेवाईक असावी.

 

पुढील स्लाइडवर जाणून घ्या, सरोगेसीसंबंधी इतर काही प्रश्नांची उत्तरे...

बातम्या आणखी आहेत...