आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिरोगी त्वचा हेच खरे सौंदर्य असते. धूळ, प्रदुषण, प्रखर ऊन या गोष्टींपासून आपण वाचू शकत नाही. यामुळे यांचा विपरीत परिणाम आपल्या चेह-यावर होतोच. मात्र थोडीशी देखभाल आणि हेल्दी डाएटने या हानिकारक तत्त्वांपासून आपण त्वचेचा सहज बचाव करू शकतो आणि आपली त्वचा नैसर्गिकरित्या स्वस्थ्य ठेवू शकतो.
सुदृध आणि निरोगी त्वचेसाठी अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची आवश्यकता असते. मात्र त्वचेसाठी व्हिटॅमीन सी विशेष फायदेशीर आहे. जर आपण रोजच्या आहारातून पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सी घेतले तर त्वचेवर सुर्यापासून निघणा-या अल्ट्राव्हायलेट किरणांचे दुष्पपरिणामही कमी प्रमाणात होतात.
व्यायामापूर्वी खा संत्री
तसे पाहता आपण कधीही संत्र्याचे सेवन करू शकतो. मात्र व्यायामापूर्वी याचे सेवन केल्यास त्याचा शरीरावर आणि त्वचेवर चांगलाच प्रभाव पडतो. संत्रीपासून एकत्रितपणे मिळणा-या व्हिटॅमिन 'ए' आणि व्हिटॅमिन 'सी'मुळे त्वचेच्या पेशी वेगाने स्वस्थ बनतात. यामुळे त्वचा उजळते व सौंदर्य वाढते.
पुढील स्लाइडवर जाणून घ्या, व्यायामापूर्वी संत्री खाण्याचे इतर फायदे...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.