आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्‍हामध्‍ये जास्‍त काळ राहणे आहे धोकादायक, होऊ शकतो हा गंभीर आजार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्‍हामध्‍ये शरीराची तसेच त्‍वचेची योग्‍य ती काळजी न घेता जास्‍त काळ राहणे धोकादायक ठरू शकते. यामुळे आपल्‍याला अनेक गंभीर आजारांना सामोरे जाऊ लागू शकते. त्‍यापैकीच एक आजार म्‍हणजे स्‍क्‍वॅमस सेल कार्सिनोमा (SSC). हा एक स्क्नि कँसर आहे. या कँसरमुळे अभिनेता टॉम ऑल्‍टरचाही मृत्‍यू झाला आहे.

 

उन्‍हामुळे होऊ शकतो हा कँसर
- अधिक गो-या लोकांच्‍या त्‍वचेमध्‍ये मेलानिन नामक पिंगमेंटची कमतरता असते. यामुळे सुर्याच्‍या अल्ट्रावॉयलेट किरणांमुळे त्‍यांना हा कँसर होण्‍याचा धोका असतो.
- तसेच उन्‍हात जास्‍त राहणा-यांना अल्‍ट्रावॉयलेट रेडिएशनचा धोकाही जास्‍त असतो. यामुळे SSC होऊ शकतो.
- रोग प्रतिकारक क्षमता कमकुवत असल्‍यास त्‍वचा UV किरणांपासून बचाव करू शकत नाही. यामुळे कँसर होऊ शकतो.
- एखाद्याला आधीच सनबर्न, स्किन डिसिज, पांढ-या डागांची समस्‍या असेल तर SSCहोण्‍याची शक्‍यता अनेक पटींनी वाढते.
- जेरोडर्मा पिगमेंटोसमसारख्‍या आजारात त्‍वचा सनलाइटप्रति खुप सेंसिटिव्‍ह होते. यामुळे स्किन कँसर होतो.


पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, स्किन कँसरपासून कसा करावा बचाव...


 

बातम्या आणखी आहेत...