आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Yoga Day 2018 : जॅकलिन 108 सूर्यनमस्कार तर करीना करते पॉवर योगा

Yoga day 2018 : जॅकलिन 108 सूर्यनमस्कार तर करीना करते पॉवर योगा, वाचा सेलिब्रेटींचे फेव्हरेट योगासन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजकाल सेलिब्रेटी फिट राहण्यासाठी आपल्या रुटीनमध्ये नवीन वर्कआउट व्यतिरिक्त योगाचाही समावेश करत आहेत. शिल्पा शेट्टी, करीना कपूर, जॅकलीन, बिपाशा बासू यासारख्या अनेक अभिनेत्री नियमितपणे योगा करतात. यासोबतच वेळोवेळी लोकांना योगसाठी प्रेरीत करण्यासाठी इव्हेन्टमध्ये सहभागी होतात. येथे जाणून घ्या, बी-टाऊनच्या अशा काही सेलिब्रेटीजविषयी ज्यांनी योगाच्या माध्यमातून आपल्या बॉडीला शेपमध्ये ठेवले आहे...


जॅकलिन फर्नांडिस - 108 सूर्यनमस्कार करते
श्रीलंकेची ब्युटी जॅकलिन दररोज जिममध्ये जाण्यासोबतच एक तास योग करते. यामध्ये ती 108 सूर्यनमस्कार करते. यासोबतच नियमितपणे हट आणि अष्टांग योग करते. फिटनेस फ्रिक जॅकलिन नेहमी नवीन योग प्रकार शिकत राहते. याचे व्हिडीओ ती इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते.


अनिल कपूर - विक्रम योग आहे फिटनेस सिक्रेट
62 वर्षांचे अनिल कपूर आजही फिट असून वयाचा प्रभाव त्यांच्या चेहरा आणि बॉडीवर फार कमी दिसतो. अनिल यांच्या फिटनेस रुटीनमध्ये अनेक वर्षांपासून हॉट योग समाविष्ट आहे. हा 50 डिग्री टेम्प्रेचरवर केला जातो. यामध्ये मांसपेशीतील वाट नष्ट होऊन चरबी कमी होण्यास मदत होते.


बिपाशा बासू - कॉम्बिनेशन योगाने राहते फिट 
फिटनेस आयकॉन बिपाशा बासू खूप आधीपासूनच योग करत आहे. वर्कआउट संदर्भात विविध प्रयोग करणाऱ्या बिपाशाने अनेक फिटनेस सीडी लॉन्च केल्या आहेत. बिपाशा दररोज 108 सूर्यनमस्कार करते. या व्यतिरिक्त कॉम्बिनेशन योग करते. हे कार्डियो आणि योगचे कॉम्बिनेशन आहे. बिपाशा सांगते की, हे क्पम्बिनेशन बॉडीला शेपमध्ये ठेवण्यासोबतच मसल्स मजबूत बनवते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर कोणते सेलिब्रेटी कोणता योगा करतात...

बातम्या आणखी आहेत...