आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोंडाच्या या गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष, विविध आरोग्य समस्यांचे देते संकेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या विविध आरोग्य समस्यांचे संकेत आपले तोंड देत असते. डॉक्टर्स तोंड आणि जीभ पाहून अंतर्गत आजाराचा अंदाज लावू शकतात. तोंडाची दुर्गंधी, हिरड्यांवरील सूज, जिभेचा रंग पाहून शरीराच्या इतर ऑर्गन्सच्या हेल्थची माहिती समजू शकते. डेंटिस्ट वर्तुळ द्विवेदी यांनी अशाच 10 संकेतांविषयीची खास माहिती दिली आहे.


ओठ फाटणे
हा व्हिटॅमिन B कमी असण्याचा संकेत आहे. हडीज्वर (शरीराच्या आतील ताप) मुळेसुद्धा ओठ फाटू शकतात.


तोंडाची दुर्गंधी
तोंडाची दुर्गंधी पोटदुखी, डायबिटीज किंवा लिव्हर डिसीज होण्याचा संकेत आहे. नेहमी तोंडाचा वास येत असल्यास याकडे दुर्लक्ष करू नका.


कमजोर दात
हा ऑस्टियोपोरोसिस आजाराचा संकेत असू शकतो. यामुळे हाडे आणि दात कमकुवत होतात.


तरुणपणात दात पडणे
रिसर्चनुसार तरुण वयात दात पडणाऱ्यांना सामान्य लोकांच्या तुलनेत किडनीचा आजार होण्याची शक्यता जास्त राहते.


झोपेत दात वाजवणे
हा तणावाचा संकेत आहे. स्ट्रेसमध्ये कार्टिसोल नाच हार्मोन जास्त तयार होतो. यामुळे हिरड्यांमध्ये वेदना आणि झोपेत दात वाजण्याची समस्या निर्माण होते.


हिरड्यामध्ये पु (पस) होणे
रिसर्चनुसार हिरड्यांचा आजार असलेल्या लोकांना कॅन्सर होण्याची शक्यता सामान्य लोकांच्या तुलनेत 50 टक्के जास्त राहते.


(सोर्स : नॅशनल लायब्रररी ऑफ मेडिसिन यूएसए, डेंटल हेल्थ फाउंडेशन आयर्लंड, अमेरिकन असोसिएशन ऑफ एंडोडोंटिक्स, अमेरिकन अकॅडमी ऑफ पेरियोडोंटोलॉजी)


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर चार आजारांचे संकेत...

बातम्या आणखी आहेत...