आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दात काढल्‍याने नजर कमी होते का? जाणून घ्‍या असेच काही Myths

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दातांबद्दलचे गैरसमज आणि पारंपरिक समजुतींमुळे आपण अनेकदा नियमित दंतोपचार घेण्याकडे डोळेझाक करत असतो. मात्र, असे केल्याने दातांच्या किचकट, अधिक गंभीर समस्या आणि व्याधी निर्माण होऊ शकतात. अशा वेळी उपचार अधिक खर्चिक होऊ शकतात. त्यामुळे स्वतःच्या आरोग्य आणि सौंदर्याची काळजी घेतानाच दातांची निगा राखणेदेखील गरजेचे असते.       दातांबद्दल जनमानसांत असलेल्या काही समजुती आणि त्यातील तथ्यांबाबत जाणून घेऊया...

 

Q- दात काढल्यास नजर कमी होते?
A- दात काढल्याने डोळ्यांना कोणतीही हानी अथवा इजा होत नाही. याचा दृष्टीशी थेट संबंथ नसतो.

 

Q- दात स्वच्छ केल्याने दात झिजतात किंवा सैल होतात?
A- दातांचे स्केलिंग केल्याने दातांवरील केवळ कठीण झालेली घाण, डाग अथवा टारटर (जे टुथब्रशने निघणे शक्य नसते) काढले जाते. या प्रक्रियेनंतर प्रारंभी दात सैल झाल्यासारखे वाटतात. मात्र, नंतर ते पूर्ववत घट्ट होतात. हिरड्यांना सूज, सळसळ अथवा काही विकार असल्यास घरी दात स्वच्छ करताना हिरड्यांमधून रक्त येऊ शकते. अशा वेळी त्वरित उपचार घ्यावेत.


पुढील स्‍लाइडवर जाणून घ्या, दातांबद्दच्‍या अशाच काही गैरसमजांविषयी...

 

 

बातम्या आणखी आहेत...