Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Online Heart Calculator That Predicts Heart Disease Risk

केवळ 3 मिनिटात समजेल किती तरुण आणि हेल्दी आहे तुमचे हृदय

हेल्थ डेस्क | Update - Jul 25, 2018, 10:32 AM IST

तुमचे हृदय निरोगी आहे की नाही, याविषयाची माहिती आता एक ऑनलाइन कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून मिळेल.

 • Online Heart Calculator That Predicts Heart Disease Risk

  तुमचे हृदय निरोगी आहे की नाही, याविषयाची माहिती आता एक ऑनलाइन कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून मिळेल. वैज्ञानिकांनी एक असे कॅल्क्युलेटर तयार केले आहे, ज्यामुळे हृदयविकाराच्या धोक्याची माहिती मिळेल. यासोबतच हृदयाचे वयही सांगेल. कॅनेडियन मेडिकल असोसिएशन जर्नलमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार हे कॅल्क्युलेटर आपल्या लाइफस्टाइलविषयी महत्त्वाची माहिती देते. आपल्या आरोग्याची माहिती सांगण्यापूर्वी कॅल्क्युलेटर वजन, उंची आणि लाइफस्टाइलची माहिती विचारते. या संपूर्ण प्रक्रियेला 3 मिनिट लागतात.


  कसे करते काम ?
  हे मॉडेल केनडातील ओटावा हॉस्पिटलमध्ये तयार करण्यात आले आहे. यावर काम करणारे वैज्ञानिक डौग मॅन्युअल यांच्यानुसार हृदयाचे आरोग्य हे मॉडेल किती टक्के बरोबर सांगते या स्टडीसाठी 1,04,219 डॉक्टरांचा समावेश करण्यात आला होता. 2001 ते 2007 पर्यंत झालेल्या या रिसर्चमध्ये या कॅल्क्युलेटरला हृदय रोगांपासून वाचणाऱ्या एका टूलप्रमाणे वापरण्यात आले. अनेक वर्षांच्या रिसर्चनंतर समजले की, हे मॉडेल कोणत्याही व्यक्तीच्या हृदयाचे आरोग्य स्पष्टपणे सांगण्यात सक्षम आहे. पुढील पाच वर्षात होणारे हृदय आजारांची माहिती देण्यासाठी हे कॅल्क्युलेटर समर्थ आहे.


  बिघडलेल्या लाइफस्टाइलबद्दलही सांगते
  वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ऑनलाइन कॅल्क्युलेटर हृदयाचे वय सांगते. ज्यामुळे भविष्यात होणाऱ्या धोक्याची माहिती समजणे सोपे होते. हृदय विकारांची माहिती देण्याव्यतिरिक्त असे का होत आहे, याविषयीची माहितीसुद्धा हे कॅल्क्युलेटर देते. हे वय, स्मोकिंग, अल्कोहोल डायट, फिजिकल ऍक्टिव्हिटी, स्ट्रेस, डायबिटीज, ब्लडप्रेशर या गोष्टींच्या आधारे माहिती देते.


  यामुळे हे देते अचूक माहिती
  ओटावा युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आणि वरिष्ठ वैज्ञानिक डौग मॅन्युअल यांच्यानुसार बहुतांश लोक हेल्दी लाइफस्टाइल असल्याचे सांगतात परंतु याविषयी डॉक्टरांकडून माहिती घेत नाहीत. याव्यतिरिक्त डॉक्टरसुद्धा रुग्णाचे केवळ ब्लडप्रेशर आणि कोलेस्ट्रॉल लेव्हल चेक करतात परंतु लाइफस्टाइलविषयी काहीच विचारात नाहीत. यामुळे लाइफस्टाइलमध्ये सुधार होत नाही आणि हार्टअटॅक आणि स्ट्रोकचा धोका राहतो.


  'बिग प्रोजेक्ट लाइफ' नाव देण्यात आले
  प्रोफेसर मॅन्युअल यांच्यानुसार या प्रोजेक्टला बिग लाइफ नाव देण्यात आले आहे. वेबसाइट https://www.projectbiglife.ca वर जाऊन आपल्या आरोग्याची माहिती समजू शकते. हे मॉडेल सध्या कॅनडात वापरण्यात येत आहे. वर्ल्ड हेक्सथ सर्व्हेनुसार इतर देशांमध्येही हे ऑनलाइन कॅल्क्युलेटर वारपारले जाऊ शकते.


  अशाप्रकारे चेक करा हृदयाचे आरोग्य
  1- वेबसाइट www.projectbiglife.ca वर जावे.
  2- हार्ट अँड स्ट्रोकवर क्लिक करा.
  3- बिगिनवर क्लिक करून प्रश्नांची उत्तरे द्या.
  4- शेवटच्या उत्तरानंतर समजेल कसे आहे हृद्य.

Trending