Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | pregnancy myths and facts in marathi

गर्भधारणेशी संबंधित या गोष्टींविषयी प्रत्येकाला माहिती असणे आहे आवश्यक

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 01, 2018, 12:02 AM IST

एखादी महिला प्रेग्नेंट होताच वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तिला सांगण्यात येतात, तसेच होणाऱ्या बाळाविषयी विविध प्रकारचे त

 • pregnancy myths and facts in marathi

  एखादी महिला प्रेग्नेंट होताच वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तिला सांगण्यात येतात, तसेच होणाऱ्या बाळाविषयी विविध प्रकारचे तर्क लावले जातात. मुलगा होणार की मुलगी, ट्विन्स होणार की सिंगल बेबी अशाप्रकारचे विविध कयास लोक लावतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही मान्यता आणि त्यासंदर्भातील रिअॅलिटी सांगत आहोत.


  Myth 1 - प्रेग्नेंसी काळात सेक्स केल्यास बाळाला नुकसान पोहोचते
  Reality -
  बाळाला प्रोटेक्ट करण्यासाठी पोटामध्ये अॅब्डॉमिनल वॉलपासून ते अॅमनियॉटिक पिशवीपर्यंत सात लेयर्स असतात. यासोबतच गर्भाशय ग्रीव्हा गर्भाशयामध्ये काहीही जाण्यापासून रोखते आणि गर्भ क्लिक आणि इन्फेक्शन फ्री ठेवते. सेक्स केल्याने काहीसुद्धा बाळापर्यंत पोहोचत नाही. मात्र डॉक्टरांनी सेक्स करण्यास मनाई केली असल्यास यापासून दूर राहावे.


  Myth 2 - जर महिलेच्या पोटाचा आकार जास्त मोठा असेल तर मुलगी होणार आणि लहान असेल तर मुलगा.
  Reality -
  एक्सपर्ट्सनुसार, पोटाचा आकार पाहून बाळाच्या लिंगाचे निर्धारण केले जाऊ शकत नाही. पोटाचा शेप, महिलेची मसल्स साईझ, स्ट्रक्चर, भ्रूणाची पोझिशन, पॉश्चर पोटाच्या जवळपास जमा असलेल्या फॅटवर निर्भर असते.


  Myth 3 - आंबट खाण्याची इच्छा झाल्यास मुलगा आणि गोड खाण्याची इच्छा झाल्यास मुलगी होते.
  Reality -
  एक्सपर्ट्सनुसार, खाण्याच्या इच्छेचा आणि बाळाच्या लिंगाचा काहीही संबंध नाही.


  Myth 4 - जर महिलेला हार्टबर्न (हृदयात जळजळ)ची समस्या असल्यास मानले जाते की, होणाऱ्या बाळाचे केस जास्त आणि चांगले असतील.
  Reality -
  प्रेग्नेंसी काळात हार्टबर्न होणे सामान्य गोष्ट आहे. याचा बाळाचे केस कमी किंवा जास्त असण्याशी काहीही संबंध नाही.


  पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर मान्यतांविषयी...

 • pregnancy myths and facts in marathi

  Myth 5 - गरोदर महिलेच्या आईची प्रेग्नेंसी सहजपणे झाली असेल तर तुमचीसुद्धा त्याप्रकारे होईल


  Reality-आनुवंशिकतेचा प्रेग्नेंसीशी काहीही संबंध नाही. डिलिव्हरी कशी होणार हे बाळाचा आकार आणि पोझिशन, आईचा आहार आणि लाइफस्टाइलवर अवलंबुन असते.

 • pregnancy myths and facts in marathi

  Myth 6 - पाठीवर झोपल्यास बाळाला नुकसान पोहोचते


  Reality-या स्थितीमध्ये झोपल्यास बाळाला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. एक्स्पर्ट डाव्या कुशीवर झोपण्यास सांगतात कारण यामुळे गर्भाशय आणि नाळमध्ये रक्तप्रवाह सुरळीत राहावा.

 • pregnancy myths and facts in marathi

  Myth 7 - पहिले मुल उशिराच जन्म घेते


  Reality- मुल लवकर किंवा उशिरा जन्माला येणे हे महिलेच्या मेन्स्ट्रूअल सायकलवर (मासिक पाळी) अवलंबलून असते. एखाद्या महिलेची ही सायकल लहान असल्यास मुल लवकर जन्माला येण्याची शक्यता राहते आणि सायकल मोठी असल्यास मुल उशिराने जन्म घेते.

Trending