आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविविध वनस्पती पूजेसाठी वापरण्यात येतात हे आपल्याला माहितच आहे. याशिवाय वनस्पतींचा वेगवेगळ्या आजारांवरही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. विशेष म्हणजे आदिवासी या वनस्तीचा आपल्या रोजच्या आहारातही वापर करतात त्यामुळे त्यांचे आजारी पडण्याचे प्रमाण खूप कमी आहे. जंगलातील विविध वनस्पतीचा आणि जडी-बूटीचा औषधात वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. ज्या वनस्पती औषध म्हणून आदिवासी वापरतात त्या वनस्पतीची अगोदर पूजा केली जाते. या वनस्पतीची पूजा करून सेवन केले तर आजार लवकर बरा होतो असे अदिवासी मानतात. आदिवासी वापरत असेलेल्या वनस्पती विविध आजारावर गुणकारी उपाय करतात हे वैज्ञानिकांनी सिध्द केले आहे.
दुर्वा- हराळी हा गवताचा प्रकार आहे. पूजेसाठी दुर्वा म्हणून या वनस्पतीचा वापर केला जातो. आदिवासींनी सांगितले आहे की, दुर्वाचे रोज सेवन केले तर शरीरामध्ये चेतना निर्माण होते. थकवा येत नाही. नाकातून रक्त येत असेल तर दुर्वाचे दोन थेंब नाकात टाकल्यानंरत रक्तस्त्राव होत नाही.
मदार- मदार या वनस्पतीला रुई या नावाने ओळखले जाते. मदारचे दूध जखमेवर लावल्यानंतर जखम लवकर बरी होते.
या आयुर्वेदिक उपचारांची माहिती देत आहेत डॉ दीपक आचार्य (डायरेक्टर-अभुमका हर्बल प्रा. लि. अहमदाबाद). डॉ. आचार्य यांनी भारतातील विविध आदिवासी पाताळकोट (मध्यप्रदेश), डाँग (गुजरात) आणि अरावली (राजस्थान) भागांमधून आदिवासी लोकांचे पारंपारिक ज्ञान एकत्रित केले आहे.
पुढील स्लाईडवर वाचा या वनस्पती विषयी...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.