आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Health: सोनाली बेंद्रेला झाला हाय ग्रेड कँसर, खुप जलद पसरतो हा कँसर, तात्काळ ट्रीटमेंट घेणे आवश्यक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्थ डेस्क: बॉलिवूड अभिनेत्री सोनाली ब्रेंद्रेने खुलासा केला आहे की, तिला हाय-ग्रेड कँसर झाला आहे. याच्यावर उपचार घेण्यासाठी ती न्यूयॉर्कमध्ये आहे. तिने सांगितले की, काही वेदनांनंतर केलेल्या टेस्टमध्ये याचा खुलासा झाला.


काय असते हाय ग्रेस कँसर
ग्रेडवरुन डॉक्टरांना समजते की, कँसर बॉडीमध्ये कशा प्रकारे पसरतोय. लो ग्रेड कँसर हळुहळू वाढतो आणि मंद गतीने पसरतो. तर हाय ग्रेड कँसर लो ग्रेड कँसरऐवजी जलद गतीने वाढतो आणि पसरतो. यामध्ये तात्काळ ट्रीटमेंट घेणे गरजेचे असते. ग्रेड-1 मध्ये कँसर सेल्स नॉर्मल सेल्स सारख्या दिसतात. ग्रेड-2 मध्ये सेल्स नॉर्मल सेल्सप्रमाणे दिसत नाही आणि ग्रेड-1 पेक्षा जलद वेगाने पसरतात. तर ग्रेड-3 मध्ये खुप एबनॉर्मल असतात आणि झापाट्याने ग्रोथ करतात.

 

कँसरचे संकेत
त्वचेवर स्पॉट दिसणे

त्वचेवर स्पॉट दिसणे आणि त्याची साइज आणि कलर चेंज होणे स्किन कँसरचा संकेत असू शकतो. तुमच्या बॉडीवर वेगळ्या प्रकारचे चट्टे किंवा मार्क येत असतील तर तात्काळ डॉक्टरांना दाखवा. हे तुमच्या बॉडीला एक्जामिन करुन योग्य प्रकारे रिजल्ट सांगतील. यामध्ये कँसर सेल जाणून घेण्यासाठी बायोप्सी केली जाऊ शकते.

 

सुस्ती किंवा थकवा राहणे
थकवा राहण्याचे अनेक कारण असू शकतात. परंतू हे ल्यूकोमिया, कोलोन आणि पोटाच्या कँसर असण्याचा पहिला संकेत आहे. जर तुम्हाला नेहमी थकवा जाणवत असेल आणि आराम करुनही जात नसेल तर डॉक्टरांना भेटा.

 

सतत कफ राहणे
तुम्ही स्मोकिंग करत नसाल तर कफ येणे कँसरचा संकेत नसू शकतो. परंतू स्मोकिंग करणा-या लोकांना कफसोबत रक्त आले तर कँसर असू शकतो. असे झाल्यावर तात्काळ डॉक्टरांना दाखवा.


पोट फुगणे
डायट किंवा स्ट्रेसमुळे पोट फुगलेले राहणे ही वेगळी गोष्ट आहे. परंतू तुम्हाला यासोबत सुस्ती, वेट लॉस आणि बॅक पेन होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. महिलांमध्ये सतत ब्लॉटिंग झाल्यावर ओवेरियन कँसरचा संकेत असतो.


घश्यात सूज
घसा, आर्मपिट आणि बॉडीच्या दूस-या ठिकाणी बीन शेपचे ग्लँड होतात. यावर सूज येणे म्हणजे तुम्हाला एखादे इन्फेक्शन झाले आहे. lymphoma आणि leukemia या प्रकारच्या कँसरमुळे असे होऊ शकते. यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.


टॉयलेटमध्ये ब्लड येणे
टॉयलेटला गेल्यानंतर ब्लड दिसले तर तात्काळ डॉक्टरांना दाखवा. पॉटीमध्ये ब्लड येण्याचे अनेक दूसरे कारणही असतात. परंतू हा कोलोन कँसरचा संकेतही असू शकतो.

 

यूरिनमध्ये प्रॉब्लम
वाढत्या वयात अनेक समस्या येतात. यामध्ये वारंवार यूरिने येणे, यूरिन लीक होण्यासारख्या समस्यांचा समावेश असतो. अनेक वेळा प्रोस्ट्रेट वाढल्यामुळे असे होते. हा प्रोस्टेट कँसरचा संकेत असू शकतो. अशा वेळी डॉक्टर स्पेशल ब्लड टेस्ट करतात याला PSA म्हणतात.

 

गिळताना त्रास होणे
सामान्य सर्दी होणे ही वेगळी गोष्ट आहे. परंतू दिर्घ काळ सर्दी बरी होत नसेल तर डॉक्टरांना दाखवा. हा घश्याचा कँसर असू शकतो.

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...