आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उष्णतेपासून तुमचे रक्षण करतील हे पदार्थ, उन्हाळ्यात अवश्य करा यांचे सेवन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाळ्यामध्ये संध्याकाळी घराबाहेर पडल्यावर खाण्यासाठी आइस्क्रीम हा एकच मेनू ठरलेला असतो. याचे फॅड दिवसेंदिवस वाढतच आहे. याच्या अमर्याद सेवनाने, सर्दी, खोकला यासारखे विकार होऊन ते पुढे बळावतात. म्हणून उन्हाळ्यामध्ये भरपूर आइस्क्रीम खाण्याचे हे फॅड कमी करून शरीराला फायदेशीर ठरतील अशा पदार्थांचे सेवन करणे आवश्यक झाले आहे. आज आम्ही तुम्हाला अशा खाद्य पदार्थांची खास माहिती देत आहोत.  उन्हाळ्यामध्ये उन्हाचा त्रास सुसह्य होण्यासाठी काही नैसर्गिक खाद्य पदार्थांचा उपयोग आपल्या खाण्यामध्ये करणे गरजेचे आहे. येथे जाणून घ्या, उन्हाळ्यात कोणत्या पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्य चांगले राहील.


1. मोरावळ्याचा वापर
आवळा हे फळ हिवाळ्यामध्ये होत असले तरी त्यापासून मोरावळा तयार करून तो मग वापरण्याची एक पद्धत आहे. या पद्धतीमुळे उन्हाळ्यामध्ये देखील आवळ्याच्या गुणधर्माचा आपल्या शरीरासाठी उपयोग होतो. आवळा हा स्वभावत:च थंड आहे. उन्हाळ्यामध्ये याचा उत्तम उपयोग होतो. साखरेच्या पाकामध्ये आवळा मुरवून त्याचा मोरावळा बनवितात हे अनेकांना ठाऊक असेलच. या मोरावळ्याचा उपयोग उन्हाळ्यातील विविध विकारांवर होतो. घशामध्ये, छातीमध्ये होणारी जळजळ, आम्लपित्तामुळे निर्माण होणारी डोकेदुखी यासारख्या अनेक तक्रारी मोरावळा या पदार्थांच्या सेवनाने दूर होतात. 


पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या उन्हाळ्यात इतर कोणत्या नैसर्गिक खाद्य पदार्थांचा उपयोग आपल्या खाण्यामध्ये करावा...

बातम्या आणखी आहेत...