आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील युवा वर्ग होत आहे ह्रदयविकाराने त्रस्‍त, अशी घ्‍या काळजी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हृदय आपल्या शरीराचा महत्त्वपूर्ण अवयव आहे. जेव्हा हृदयक्रिया चालू असते तेव्हा आपल्या शरीरात प्राण असतात, जेव्हा हृदयक्रिया बंद पडते तेव्हा मानवाचे संपूर्ण शरीर काम करणे बंद करते. त्यामुळे हृदयक्रिया सतत चालू राहणे हे आपल्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे.

 

अनेक वेळा काही शारीरिक व्याधींमुळे हृदयक्रिया कमी जास्त होते. हृदयक्रिया कमी अथवा जास्त झाल्याने अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. ही परिस्थिती हृदयाबरोबरच शरीरातील अन्य अवयव जसे की फुफ्फुस, यकृत, किडनी आणि डोक्यालाही नुकसान पोहोचवू शकतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार हृदयाशी संबंधित आजारांमुळे मृत्यू होण्याचे सर्वाधिक प्रमाण भारतीय उपखंडात आहे.


भारतीयांमध्ये का वाढत आहेत हृदयाचे आजार
हृदयरोग संपूर्ण विश्वात गंभीर आजार म्हणून समोर येत आहे. मागील काही वर्षात या रुग्णांची संख्या तीन पट वाढली आहे. आपल्या देशात तर कमी वयातील लोकही या आजाराच्या विळख्यात सापडत आहेत. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार हृदयरोगापासून स्वत:ला वाचवणे कठीण नाही. आहारावर नियंत्रण, नियमित व्यायाम, धूम्रपान, तंबाखूचे व्यसन सोडणे, या तीन गोष्टी केल्यास कोणताही व्यक्ती हृदयरोगापासून वाचू शकतो. याशिवाय वयाच्या पन्नाशीनंतर वर्षात किमान एकदा संपूर्ण हृदयतपासणी केली पाहिजे.


एका रिपोर्टनुसार भारतात हृदयविकार असलेल्या जवळपास १२ टक्के लोकांचे वय ४० वर्षांपेक्षा कमी आहे. ही संख्या पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. हृदयविकाराचा झटका आलेले १५ ते २० टक्के रुग्ण २० ते ४० वर्षे वयोगटातील असतात. २००५ मध्ये सुमारे २.७ कोटी भारतीय हृदयविकाराने त्रस्त होते. ही संख्या २०१० मध्ये ३.५ कोटी व २०१८ पर्यंत जवळपास ९ ते १० कोटीपर्यंत पोहोचली आहे.

 

तणावामुळे हृदयराेग

अत्यंत शारीरिक व भावनिक तणाव हृदयरोगाला कारणीभूत ठरत असतो. यामुळे पूर्ण शरीरावर दबाव पडतो, त्यासाठी नियमित व्यायाम, योग, ध्यान याव्दारे तणाव दूर करून हृदयाचे संरक्षण केले जाऊ शकते. कामकाजी लोकांच्या जीवनाचा निम्म्याहून अधिक वेळ कामाच्या जागी व्यतित होत असतो. काही लोक रात्रपाळीत काम करतात, त्यांनी तर विशेष काळजी घेतली पाहिजे, जर तुम्ही रात्री उशिरापर्यंंत काम करीत असाल, तर खाण्यापिण्याबाबत दक्ष राहिले पाहिजे.

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, ह्रदय रोगाची लक्षणे आणि ह्रदय निरोगी ठेवण्‍याचे उपाय...

बातम्या आणखी आहेत...