आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Health: प्रेग्नेंसीच्या काळात थकवा, भिती, मूड स्विंगपासून बचाव करण्यासाठी करा या एक्सरसाइज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्थ डेस्क : प्रेग्नेंसीचे आठ महिने पुर्ण झाल्यानंतर चिडचिड, वोमेटिंग, थकवा येणे या सामान्य समस्या आहे. या काळात वजन वाढल्यामुळे महिलांना आळस येतो. अशा वेळी मूड स्विंग म्हणजेच क्षणोक्षणी मूड बदलतो. अशावेळी एक्सरसाइज, योग, प्राणायाम आणि नियमित वॉक करुन महिला फिट आणि आनंदी राहू शकता. यासोबतच प्रेग्नेंसीच्या काळात होणारा डायबिटीजचा धोका कमी केला जाऊ शकतो. एवढेच नाही तर लेबर पेनपासून आराम मिळतो आणि डिलीवरीमध्ये कॉम्प्लिकेशनचा धोका कमी होतो. फिटनेस एक्सपर्ट राजकुमार कुमावत सांगत आहेत बटरफ्लाय एक्सरसाइज कशी करावी...


प्रश्न : प्रेग्नेंसीच्या तिस-या महिन्यापासून बटरफ्लाय एक्सरसाइज सुरु करता येऊ शकते. हे पेल्विक एरियाला प्रभावित करते. यासोबतच पाय आणि थाइज एरियामध्ये लवचिकपणा वाढवते. थाइजची स्ट्रेचिंग होते. लोवरबॉडीची स्ट्रेचिंग झाल्याने या भागात जमा झालेले फॅट हळुहळू कमी होते. यामुळे थकवा कमी येतो.


प्रश्न  : हे करण्याची योग्य पध्दत कोणती?
उत्तर : जमीनीवर बसा. दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवून दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना टच करा. मग दोन्ही हात पायांवर ठेवत थाइज फ्लोरला टच होऊ द्या आणि नंतर उचला. बटरफ्लायप्रमाणे हे पुन्हा पुन्हा करा. कंबर ताठ ठेवा. यामुळे शरीराच्या खालच्या भागाचे मसल्स ओपन होतात. नॉर्मल डिलीवरी होण्यास सोपे जाते आणि पेन कमी होतो. ही क्रिया करताना तुम्हाला कंबरेच्या खालच्या भागात वेदना होत असतील तर हे अजीबात करु नका. 


प्रश्न : यासोबत कोणती एक्सरसाइज किंवा योग करावा?
उत्तर : अनुलोम विलोम आणि शवासनसारखे काही योग आणि प्राणायाम केले जाऊ शकतात. हे केल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. स्ट्रेस फ्री राहण्यासाठी हे अवश्य करा. तुम्हाला कंफर्ट वाटेल अशा स्थितीत जमिनीवर बसा. यानंतर उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा, श्वास आत घ्या. नंतर त्याच हाताच्या डाव्या बोटाने डावी नाकपुडी बंद करुन उजव्या नाकपुडीने श्वास सोडा. ही प्रक्रिया दुस-या नाकपुडीने करा.

 

मानसिक शांतता आणि स्ट्रेस रिलीजसाठी शवासन करा - प्रेग्नेंसीच्या काळात शवासन केल्याने मानसिक शांतता मिळते. या आसनाने गर्भातील बाळाचा विकास चांगल्या प्रकारे होते. यासाठी बेडवर सरळ झोपा. आपले हात पाय मोकळे करा. नंतर पुर्णपणे स्ट्रेस फ्री व्हा. हळुहळू दिर्घश्वास घ्या आणि सोडा. यामुळे थकवा आणि स्ट्रेस दूर होईल.

 

बातम्या आणखी आहेत...