आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनुष्य शरीरातील हाडांविषयी या गोष्टी कदाचित माहिती नसाव्यात तुम्हाला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण आपल्या हाडांकडे तोपर्यंत लक्ष देत नाहीत जोपर्यंत एखादे हाड मोडत नाही किंवा म्हातारपणी एखादा आजार होत नाही. सांगायचे फक्त एवढेच आहे की, आपल्या हाडांना आयुष्भर काळजी आणि पोषणाची आवश्यकता आहे. मनुष्याच्या सांगाडा महत्त्वपूर्ण कार्य करतो, उदा. रक्ताची संरचना कायम ठेवणे, शरीराची हालचाल आणि नवीन कोशिकांचे निर्माण करणे. आज आम्ही तुम्हाला मनुष्य सांगाड्याशी संबंधित चकित करणारे काही तथ्य सांगत आहोत.


शरीरात अर्ध्यापेक्षा जात हाडे हात आणि पायामध्ये असतात
शरीरामध्ये हाडांचे विभाजन समान होत नाही. हातामध्ये 27 आणि पायामध्ये 26 हाडे असतात. याचा अर्थ दोन्ही हात आणि पायामध्ये एकूण 106 हाडे असतात. अशाप्रकारे आपल्या शरीरातील अर्ध्यापेक्षा जास्त हाडे हात आणि पायामध्ये असतात.


हाडे मनुष्य शरीरातील सर्वात ठोस गोष्ट नाही
मनुष्य शरीरात सर्वात ठोस टूथ इनॅमल (दातांचे आवरण) असते. टूथ इनॅमल दातांचे रक्षण करते आणि यांना कायम ठेवते. कॅल्शियमसारख्या मिनरल्सच्या उपस्थितीमुळे हे मजबूत राहते.


हाडे स्टीलपेक्षा जास्त मजबूत आहेत
जर आपण हाडे मजबूत असल्याचे मानत असू तर आपण याची तुलना एखाद्या मजबूत गोष्टीशी करू शकतो. हाडे स्टीलच्या तुलनेत 6 पट जास्त मजबूत असतात.


हाडे जिवंत असतात
बहुतांश लोक मानतात की, हाडे मृत कोशिका आहेत. परंतु हाडे जोपर्यंत मनुष्याच्या शरीरात असतात तोपर्यंत जिवंत असतात. हाडांचे नस आणि रक्त वाहकांचे नेटवर्क असते. ते कॅल्शियम गोळा करू शकतात आणि यामध्ये जिवंत कोशिका असतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर काही खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...