Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | viral fever symptoms and home remedies

का होतो व्हायरल फीव्हर? बचावाचे आहेत हे सोपे उपाय

हेल्थ डेस्क | Update - Jul 26, 2018, 12:07 AM IST

सध्याच्या पावसाळी वातारवणात व्हायरल फीव्हर होणे सामान्य गोष्ट आहे. व्हायरल फीव्हर कोणत्याही व्हायरसमुळे होणारा आजार नाही

 • viral fever symptoms and home remedies

  सध्याच्या पावसाळी वातारवणात व्हायरल फीव्हर होणे सामान्य गोष्ट आहे. व्हायरल फीव्हर कोणत्याही व्हायरसमुळे होणारा आजार नाही. विविध प्रकारच्या व्हायरसमुळे होणाऱ्या इन्फेक्शनमुळे जो ताप येतो त्याला व्हायरल फीव्हर म्हटले जाते. यावर उपचार करण्याची पद्धत समान असते कारण याचे जवळपास संकेत एकसारखेच असतात.


  का होतो व्हायरल फीव्हर?
  1. व्हायरसमधून कंटॉमिनेटेड फूड किंवा बेवरेज घेतल्यामुळे
  2. दूषित हवेतून श्वास घेतल्याने श्वासांच्या माध्यमातून व्हायरस बॉडीमध्ये जाऊ शकतात.
  2. एखाद्या इन्फेक्टेड पर्सनसोबत (ब्लड, फिजिकल) संपर्कात आल्यामुळे होऊ शकते.


  डॉक्टरांचा सल्ला घ्या...
  व्हायरल फीव्हरसाठी आपल्या मनानेऔषध किंवा अँटिबायेटिक्स घेणे हानिकारक असते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेच औषध किंवा अँटिबायोटिक्स घेऊ नका.


  कसा करावा बचाव?
  - उकळून गाळलेले किंवा प्यूरीफाय केलेले शुध्द पाणी प्यावे.
  - खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल ठेवणे हे नेहमी लक्षात ठेवा.
  - घरात वापरले जाणारे टॉवेल रोज धुवा किंवा बदलत राहा.
  - बाहेर पडताना, तोंड, नाक झाकून किंवा रुमाल बांधून जा.
  - डासांपासून बचाव करण्यासाठी रेपेलेंट किंवा मच्छरदानीचा उपयोग करा.
  - बाहेर खाणे किंवा रस्त्यांच्या कडेला उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका.
  - गर्दीच्या ठिकाणी, म्हणजेच थिएटर, मॉल इत्यादी ठिकाणी जाणे टाळा.


  पुढील स्लाईड्सवर वाचा, व्हायरल फीव्हरचे घरगुती उपाय...

 • viral fever symptoms and home remedies

  व्हायरल फीव्हरचे घरगुती उपाय 
  1.
  बटाट्याचे तुकडे व्हेनेगरमध्ये भिजवा. हे एखाद्या स्वच्छ कपड्यात गुंडाळून डोक्यावर ठेवल्याने फायदा होतो. 
  2. लिंबूचे तुकडे कापून तळव्यांवर घासावे किंवा कापलेले तुकडे सॉक्समध्ये टाकून रात्रभर घालून ठेवा. 
  3. लसूण बारीक करून एक चमचा मधासोबत खा. मोहरीच्या तेलामध्ये लसूण तळून याने मालिश करा. 

 • viral fever symptoms and home remedies

  4. चार ग्लास पाण्यात 20-25 तुळशीचे पान, अद्रकचा तुकडा आणि 3-4 लवंग उकळा. प्रत्येक दोन तासांत हे पाणी प्या. 
  5. कडू लिंबाचे कोमल पान चावून, लिंबाच्या पाण्याने अंघोळ केल्याने आणि रूममध्ये लिंबाचे पान ठेवल्याने फायदा होतो. 

Trending