आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Health: व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे होतात या 7 आरोग्य समस्या, सर्वेमध्ये आले समोर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्थ डेस्क : गुजरातच्या राजकोटमध्ये 200 लोकांवर व्हिटॅमिन B12 सर्वे करण्यात आला. यामधील 176 लोकांमध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता आढळून आली. काही लोकांमध्ये याचे प्रमाण 30pg/ml पेक्षाही कमी होते. विशेष म्हणजे सर्वे केलेल्या लोकांमध्ये 88 टक्के लोक व्हेजिटेरियन होते. म्हणजेच व्हेजिटेरियन लोकांच्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन B12 पोहोचू शकत नाही.


हा सर्वे इंदौरच्या डायटिशियन डॉ. प्रिती शुक्लाने केला आहे. हाँगकाँगमध्ये सुरु असलेल्या एशियन फेडरेशन ऑफ डायटिशियन असोसिएशनच्या अॅनुअल कॉन्फ्रेंसमध्ये गुरुवारी व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेविषयीचा आपला रिसर्च त्या प्रेजेंट करणार आहेत. यापुर्वी त्यांनी B12 विषयी आमच्या वेबसाइटशी बातचीत केली.

 

व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेने काय होते
- हात पायांमध्ये मुंग्या येतात.
- पायांमध्ये वेदना राहतात.
- झोप येत नाही.
- डायजेशन सिस्टम खराब होते. अन्न पचन होत नाही.
- शॉर्ट टर्म मेमोरी लॉसची समस्या होते.

 

B12 बॉडीमध्ये जाऊन काय करते
- व्हिटॅमिन B12 ब्लड सेल्सला सपोर्ट करते. नर्व हेल्दी ठेवते. यासोबतच डीएनए प्रोडक्शनमध्ये मदत करते. प्रेग्नेंट महिलांना याची जास्त गरज असते.
- याचे नॉर्मल प्रमाण 211 ls 911pg/ml असायला हवे.
- सर्वेमध्ये सहभागी असलेल्या लोकांमध्ये 123 ते 124 pg/ml प्रमाण मिळाले.
- तर काही लोकांमध्ये याचे प्रमाण 30pg/ml पेक्षाही कमी होते.

खुप कमी असेल तर काय समस्या होतात
- उभे राहताना चक्कर येतात.
- डोळ्यांवर अंधारी येते.
- झोप यायला खुप वेळ लागतो.
- हात-पाय शुन्य होतात.

 

कमतरता पुर्ण कशी करावी
- डॉ. अग्रवालने सांगितले की, शाकाहारी भोजन घेणारे लोकही याची कमतरता पुर्ण करु शकतात. तुम्हाला असे काही संकेत दिसले तर तुम्ही जास्त प्रमाणात दही खावे. डाळही खाऊ शकतात.
- तुम्ही सप्लीमेंट्सच्या माध्यमातून याची कमतरता पुर्ण करु शकता. 

बातम्या आणखी आहेत...