आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 मिनिटांत प्‍लास्टिक बॉटल करा स्वच्‍छ, अशी आहे पद्धत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्‍क- बाहेर असताना, प्रवासादरम्‍यान, शाळेत किंवा ऑफीसमध्‍ये प्रत्‍येकजण पाणी पिण्‍यासाठी प्‍लास्टिक बाटलीचा वापर करताना दिसतो. या बाटलींना साफ करणे कठिण वाटते. मात्र येथे आम्‍ही तुम्‍हाला अशी ट्रिक सांगणार आहोत, ज्‍याच्‍या मदतीने तुम्‍ही अगदी सहजतेने अगदी 5 मिनिटांत प्‍लास्टिकची बाटली स्‍वच्‍छपणे धुवू शकता. 


पहिली पद्धत 
बाटली स्‍वच्‍छ करण्‍यासाठी यामध्‍ये 1 चमचा बेकिंग सोडा आणि 2 चमचे व्हिनेगार टाका. नंतर याला चांगल्‍या पद्धतीने शेक करून 5 मिनिटांसाठी तसेच सोडून द्या. आता बाहेरून बाटलीला स्‍वच्‍छ करण्‍यासाठी एक ब्रश घ्‍या व त्‍याला बाटलीतील त्‍या मिश्रणाद्वारे भिजवून घ्‍या. या ब्रशने बाटलीचे झाकण, त्‍याच्‍या आजुबाजूचा परिसर व संपुर्ण बाटली चांगल्‍या पद्धतीने स्‍वच्‍छ करून घ्‍या. तुमची बाटली अगदी स्‍वच्‍छ होऊन जाईल. 


दुसरी पद्धत 
अर्धी बॉटल पाण्‍याने भरून घ्‍या. लिंबाचे छोटेछोटे तुकडे करुन यामध्ये टाका. आता यामध्‍ये 2 चमचे मीठ टाका. नंतर यामध्‍ये तुम्‍हाला आइस क्‍युब टाकावे लागेल. आता याला चांगल्‍या पद्धतीने शेक करून घ्‍या. यामुळे तुमची बाटली आतून स्‍वच्‍छ होऊन जाईल. तसेच यात काही दुर्गंधी असेल तर तीही दूर होईल. आठवड्यातून एक वेळेस तुम्‍ही ही प्रक्रिया करू शकता. 

 

बातम्या आणखी आहेत...