Home »Jeevan Mantra »Arogya/Ayurved» Ayurveda Health Benefits Of Turmeric

SPECIAL USES : या आजारांवर हळद आहे रामबाण उपाय

हळद, हरिद्रा, कांचनी, पीता, अरशीन आदी नावाने ओळखली जाणारी औषधी वनस्पती आपल्या परिचयाची आहे.

जीवनमंत्र डेस्क | Oct 11, 2017, 14:47 PM IST

हळद, हरिद्रा, कांचनी, पीता, अरशीन आदी नावाने ओळखली जाणारी औषधी वनस्पती आपल्या परिचयाची आहे. प्राचीन काळापासून हळदीचा वापर भारतीय लोक जेवणात करतात. हळदीमुळे जेवण स्‍वादिष्‍ट तर बनतेच त्‍याशिवाय आरोग्‍यासाठीही ते लाभदायक असते. आयुर्वेदात तर हळदीला अमृत तुल्य औषधी मानण्यात आले आहे. सुंदरतेच्या बाबतीतही हळद गुणकारी आहे आणि सौंदर्याच्या अनेक समस्या दूर करण्यात सक्षमही आहे.

गुणकारी -
- हळदीत आढळून येणारा करक्युमिन नावाचा घटक याला पिवळ रंग देतो. तो कलरिंग एजंटप्रमाणे काम करून त्वचेचा रंग खुलवतो.
- अँटिसेप्टिकशिवाय हळदीत अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात. त्यामुळे हळद त्वचेसाठी उपयुक्त आहे.
- हळद अँटिऑक्सीडंटचे काम करते. त्वचादेखील तरुण राहते. त्याचबरोबर त्वचेवरील सुरकुत्या किंवा इतर समस्यांपासूनही बचाव होतो.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, हळदीचे काही खास उपाय आणि फायदे...

Next Article

Recommended