आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोमॅटो खाणे ठरू शकते फायदेशीर, कॅन्सरही दूर राहण्यास होते मदत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोमॅटोकडे केवळ भाजी स्वरूपातच पाहू नका, यामध्ये विविध प्रकारचे औषधी गुणही आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सीडेंट आणि विशेषतः लायकोपीन आढळून येते. लायकोपीन तत्वामुळे टोमॅटोचा रंग लाल होतो. हे प्रोस्टेट कॅन्सर आणि हृदयाचे आजार दूर ठेवण्यास मदत करते.
 
टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, वसा इ पौष्टिक तत्व आढळतात. अशा पौष्टिक तत्वांनी भरलेल्या टोमॅटोचे सेवन प्रत्येक ऋतूमध्ये फायदेशीर ठरते. तुम्ही हे भाजी किंवा सलाड स्वरुपात खाऊ शकता, हे तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरेल. येथे जाणून घ्या, टोमॅटो खाण्याचे खास फायदे...
 
1.जेवण करण्यापूर्वी दोन टोमॅटो कापून त्यावर काळेमीठ, बारीक केलेली काळी मिरी, धने पावडर टाकून खावे. यामुळे चेहऱ्यावर लाल येईल तसेच पौरुष शक्ती वाढेल. पोटात जंत झाले असल्यास टोमॅटोवर बारीक केलेली काळीमिरी टाकून खाल्ल्यास लाभ होईल. डायबिटीजच्या रुग्णांसाठीसुद्धा टोमॅटो फायदेशीर ठरते. टोमॅटो खाणाऱ्या लोकांना कॅन्सर होत नाही. दाम्याचा त्रास असलेल्या लोकांनी वर्षभर टोमॅटोचे सेवन करावे. याच्या नियमित सेवनाने श्वसन नलिकेवरील सूज कमी होते.
 
टोमॅटो खाण्याचे इतर फायदे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...